"त्या" पशुपालकास वन विभागाने आर्थिक मदत करावी. • माजी जि.प.सदस्य,आकाश कोरे यांची मागणी.

"त्या" पशुपालकास वन विभागाने आर्थिक मदत करावी.


माजी जि.प.सदस्य,आकाश कोरे यांची मागणी.


नरेंद्र मेश्राम!प्रतिनिधी!भंडारा                                      एस.के.24 तास


भंडारा : तालुक्यातील किटाडी चे पशूपालक राजेंद्र रामजी मालोदे यांचे मालकीच्या बैलास पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून ठार मारले. तर गायीस जखमी केल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. वन विभागाने त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. तथा गायीचे उपचारास आर्थिक मदत करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे. 


वन परिक्षेत्र अड्याळ अंतर्गत सहवन क्षेत्र किटाडी चे अधिनस्त वनरक्षक बीट देवरी आणि परिसरातील वनक्षेत्रालगत असलेल्या गवताचे कुरणात पशुपालक पाळीव प्राण्यांना चाराईसाठी सोडतात.देवरी,ता.लाखनी कक्ष क्रमांक २१३ मध्ये दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने शुक्रवारी सायंकाळचे सुमारास पाळीव जनावरावर अचानक हल्ला केला. त्यात राजेंद्र मालोदे यांचा बैल ठार झाला. तर गाय जखमी झाली.गुराख्यांनी आरडा-ओरड केल्याने वाघ पळून गेला.असे आकाश कोरे यांचे म्हणणे आहे. 


घटनेची माहिती होताच वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे,क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांचे मार्गदर्शनात वनरक्षक,नितीन पारधी यांनी सहकाऱ्यांचे उपस्थितीत पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त पशुपालकास वन विभागाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. तसेच जखमी गायीवर उपचारासाठी आर्थिक मदत करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !