अति वेगामुळे तरुणाचा अपघात ; गंभीर जखमी.

अति वेगामुळे तरुणाचा अपघात ; गंभीर जखमी.


एस.के.24 तास


सिंदेवाही : सविस्तर वृत्त आज दि. २२/०२/२०२३ ला सायंकाळी ५ वाजता एक दुचाकी चालक अपघातातील युवकाचे नाव (मारोती बोरकर वय,२७ वर्षे रा.सिंदेवाही जि. चंद्रपूर) सदर युवक भरधाव वेगाने सिद्धार्थ चौक ते पोलीस स्टेशन दरम्यान रोड वरून जात असताना. त्याच्या समोर सर्वोदय शाळेसमोरील गतिरोधक जवळ त्याने जागेवर ब्रेक मारला. त्याची दुचाकी जागेत स्लीप झाली  त्याचा गाडीवरचा नियंत्रण सुटला व तो जागेवर पडला अपघात इतका भयंकर होता कि त्याच्या ब्रेक लावण्याचा आवाज अगदी १०० मीटर पर्यंत झाला. अपघात होताच तो जागेवर बेशुद्ध झाला त्याच्या डोळ्याला तसेच कपाळाला जबर मार लागला. जागेवर रक्ताची धार वाहू लागली. 


नशीब ! त्या  दुचाकी अपघातात कोणी शाळकरी मुलगी आली नाही.नेमकीच शाळेची सुट्टी झाली होती समोर शाळकरी मुलींची वर्दळ होती. सदर अपघात घडताच त्वरित काही सृजान युवकांनी त्याला ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलविले.व लगेच उपचार सुरु केला. सदर युवकांच्या तत्परतेमुळे जखमीचे प्राण वाचले.      

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !