जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात नॅशनल अप्रेंटिशिप अवेअरनेस वर्कशाप चे आयोजन.



जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात नॅशनल अप्रेंटिशिप अवेअरनेस वर्कशाप चे आयोजन.


एस.के.24 तास


चंद्रपूर : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचे वतीने चंद्रपूर सिव्हिल लाईन स्थित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयात (शास.आय.टी.आय जवळ)  येत्या ९ फेब्रुवारी ला सकाळी १०  ते सायंकाळी ५  या दरम्यान एक दिवशीय नेशनल अप्रेंटिशीप अवेअरनेस वर्कशाप चे  आयोजन करण्यात आलेले आहे. 


 या कार्यशाळेत चंद्रपूर,गडचिरोली आणि गोंदिया या तीनही जिल्ह्यातील उद्योजक व माजी प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. करिता या  अवेअरनेस वर्कशॉप चा लाभ संबंधितांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री.रविंद्र मेहेंदळे यांनी एका पत्रान्वये  केलेले आहे.या वर्कशॉप मध्ये‌ बोट, आरडीइएस,एमएसएमई विभागाचे वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी अप्रेंटीस नोंदणी व नियमावली संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !