विकास फाउंडेशनचा मोहाडी तहसील कार्यालयावर मोर्चा. - माजी आमदार,चरण वाघमारे

 


विकास फाउंडेशनचा मोहाडी तहसील कार्यालयावर मोर्चा. - माजी आमदार,चरण वाघमारे

   

नरेंद्र मेश्राम : प्रतिनिधी,भंडारा


भंडारा : शेतकरी,शेतमजूर तसेच इतर सामाजिक घटकांच्या विविध प्रकारच्या मागण्यासंदर्भात केन्द्र आणी राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आज विकास फाउंडेशन भंडारा जिल्ह्याचे वतीने मोहाडी तहसील कार्यालयावर माजी आमदार चरण वाघमारे यांचे नेतृत्वाखाली जनसुनावणी मोर्चा आयोजित करण्यात आला असुन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमातून केले आहे.


शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतमालाच्या उत्पादन खर्चाचे मानाने शेतमालाला परवडण्यासारखे भाव नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन यावर उपाय म्हणून रब्बी हंगामात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा मानस असूनही शासनाच्या तुघलकी धोरणाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे.


 खरीप हंगामातील पिके हातात आले असतांना जेव्हा शेतीला विजेची गरज नव्हती तेव्हा मात्र राज्य सरकारने दिवसा बारा तास वीज देऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.परंतु आता रबी हंगामातील धान पिकाची लागवड होत असतांना दिवस पाळीत अठरा तास विजेची गरज असतांना रात्र व सकाळ अशा पाळीत मात्र आठ तास वीज पुरवठा होत असुन शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन रात्रीला शेतावर जावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.


केंद्र सरकारच्या सर्वांना घरे या योजनेत अनेकांची घरे मंजूर करण्यात आली असली तरी मात्र बांधकामासाठी लागणाऱ्या रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने रेती अभावी अनेकांची घरकुल बांधकाम रखडली असल्याने राज्यशासनाने विनामूल्य पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी. शासकीय व इतर खाजगी कामांकरिता पाचशे रुपये दराने रेतीची रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी.गाळमुक्त धरण गाळयुक्त शेती योजना सुरु करुन तलाव,नाला,बोड्या अशा कामांचे खोलीकरण तात्काळ सुरू करावे व शेतकऱ्यांना शेतीकरिता  विनामूल्य गाळउपलब्ध करून द्यावी.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान परत करण्यासाठी जारी करण्यात आलेले पत्र परत घेऊन शेतकऱ्यांचे खात्यात तात्काळ अनुदान जमा करावे.


अशा अनेक मागण्या संबंधात केंद्र व राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांचे नेतृत्वाखाली, कार्याध्यक्ष डॉ युवराजजी जमईवार यांचे उपस्थितीत आज दि १६/२/२०२३ गुरुवारला सकाळी ११ वाजता विकास फाउंडेशन भंडारा जिल्ह्याचे वतीने भव्य जनसुनावणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.


 असुन मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता चौंडेश्वरी मंदिरापासून जिल्हा परिषद शाळा ते शिवाजी चौक मार्गे 12 : 00.वा. तहसील कार्यालय मोहाडी येथे धडकणार असुन मोर्चाचे यशस्वीतेकरिता समस्त शेतकरी बंधु,घरकुल लाभार्थी,तसेच युवक,विकास फाउंडेशन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार,चरण वाघमारे यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !