वनपरिक्षेत्र अधिकारी,अरविंद पेंदाम निलंबित.
★ वन जमिनीवरील प्लॉट विक्री प्रकरणी कारवाईतील निलंब भोवला.
एस.के.24 तास
गडचिरोली : शहरातील आय.टी.आय ते गोकुळनगर बायपास मार्गावरील असलेल्या सर्व्हे क्रमांक २१ मधील १.२९ हेक्टर वनजमिनीवर भूमाफियांनी अतिक्रमण केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यास विलंब केल्या प्रकरणी गडचिरोली वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद पेंदाम यांना निलंबित करण्यात आले.
खरेदीदारांनी पैसे परत घेण्यास तगादा लावला.
गोकुलनगर बायपास मार्गावर असलेल्या मोक्याच्या भूखंडावर विलंब भूमाफियांनी कब्जा केला.मात्र वनविभागाने अनेक दिवस कारवाई केली नाही.त्यातील काही भूखंड लाखो रुपयांना विकण्यात आले.प्रकरण उजेडात आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यास केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी,अरविंद पेंदाम यांची सुद्धा चौकशी करण्यात आली.यात ते दोषी आढळून आल्याने त्यांना वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांनी निलंबित केले आहे.