शिक्षक व विद्यार्थींनी महाविद्यालयला मोठे केले वार्षिकोत्सव व शैक्षणिक श्रेष्ठता पुरस्कार वितरण सोहळा. - प्राचार्य डॉ.ईश्वर मोहुर्ले


शिक्षक व विद्यार्थींनी महाविद्यालयला मोठे केले वार्षिकोत्सव व शैक्षणिक श्रेष्ठता पुरस्कार वितरण सोहळा. - प्राचार्य डॉ.ईश्वर मोहुर्ले 


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,०३/०२/२३" कोरोनाच्या प्रादुर्भावाचा जास्त फटका शिक्षणव्यवस्थेला बसला.अध्यापन,अध्ययन,परीक्षापध्दती बदलली.पुस्तकावर जगण्यापेक्षा मोबाईलला विद्यार्थी महत्व देऊ लागले,पण पुस्तकातून ज्ञान मिळते अन् मोबाईलमधून माहिती हे आपण समजून घ्या. विद्यार्थी विवेकी असावा.आत्मविश्वास, जिद्द,एकाग्रता निर्माण करणे काळाची गरज आहे.हे आम्ही आमच्या  काळात केलेत, त्यामुळे नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडलेत आणि या महाविद्यालयाला मोठे केले. " असे मार्मिक विवेचन अर्जुनी (मोर) येथील एस एस जायस्वाल महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी केले. 



ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय आणि शांताबाई महिला महाविद्यालय आयोजित वार्षिकोत्सव व शैक्षणिक श्रेष्ठता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद् घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष स्नेहलताताई भैया तर प्रमुख अतिथीत संस्थेचे सचिव अशोक भैया, सहसचिव अॅड भास्करराव उराडे,ज्येष्ठ सदस्य प्रा सुभाष बजाज उपस्थित होते.आयोजक म्हणून प्राचार्य डॉ डी एच गहाणे, प्राचार्य डॉ हर्षा कानफाडे,मेजर विनोद नरड,डॉ सुभाष शेकोकर,प्रभारी प्रा डॉ रतन मेश्राम,प्रवीण चलाख,ऋतुजा राऊत व्यासपीठावर आसनस्थ होते. 
कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना विद्यापिठगीताने व स्वागतगीताने झाली.पाहुण्यांनी शुभेच्छापर भाषणे केलीत.अध्यक्षीय मनोगतात, कठिण परिस्थितीतून यश संपादन करता येते. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आहेत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन स्नेहलताताई भैयांनी केले. 

   यानंतर शैक्षणिक श्रेष्ठता शिष्यवृत्ती वितरण समारंभ पार पडला.यात प्राध्यापक व संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपञ,स्मृतीचिन्ह व रोख राशी देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठातून उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविलेली प्रियंका दिघोरे व नवलाखे अवार्डप्राप्त प्राची इनकणे, गुणवंत प्राध्यापकांचा विशेष सत्कार केल्या गेला. 


     प्रास्ताविक, परिचय प्राचार्य डॉ डी एच गहाणे,संचालन प्रभारी प्रा,आकाश मेश्राम,पुरस्कार वितरण सोहळ्याचे संचालन प्रा बालाजी दमकोंडवार,प्रा दलेश परशुरामकर,प्रा वर्षा चंदनशिवे, प्रा अजय खोब्रागडे,डॉ एम डी दुपारेंनी केले तर आभार डॉ युवराज मेश्रामांनी मानले.यशस्वीतेसाठी डॉ,सुभाष शेकोकर,डाॅ राजेंद्र डांगे,डाॅ तात्याजी गेडाम,डाॅ रेखा मेश्राम,डाॅ असलम शेख,डॉ धनराज खानोरकर,डॉ मोहन कापगते, डॉ किशोर नाकतोडे,डॉ योगेश ठावरी,डाॅ अरविंद मुंगोले,प्रा मिलिंद पठाडे,डॉ,ऐ एन येरपुडे,डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे,प्रा रुपेश वाकोडीकर,डॉ भास्कर लेनगुरे, प्रा निलिमा रंगारी इ. समिती प्रभारींनी व समिती सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !