रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी महिला जखमी.

 


रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी महिला जखमी.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास

                          

 ब्रम्हपुरी : दिनांक,२७/०२/२३ ब्रह्मपुरी तालुक्यातील रनमोचन(खरकाळा) येथील शेतकरी महिला सौ.कांताबाई सोमेश्वर दोनाडकर (48) आपल्या शेतावर काम करीत असतात अचानक आलेल्या रान डुकराने हल्ला केला त्यात सदर महिला गंभीर जखमी झाली.तिला ग्रामीण रुग्णालय,ब्रम्हपुरी येथे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.       

   

सध्या ग्रामीण भागातील शेतक-यांची आपल्या शेतातुन उळीद,मूग,जवस,लाख,हरबरा,गहू व अन्य पिकाची काढणी सुरू असल्यामुळे सकाळ पासून तर सायंकाळ पर्यत आपल्या कामात व्यस्त असतात. तालुक्यात वाघाचा व रान डुकराचा हैदोस आहे.वन्यप्राण्यांच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेती कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.


सदर घटनेची माहिती गोवर्धन दोनाडकर पत्रकार यांनी उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड यांना दिली व लगेच कुठलाही विलंब न करता  ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या मेंडकी श्रेत्रातील रनमोचन(खरकाळा) येथील घटनेची दखल श्रेत्र सहाय्यक सेदुरकर साहेब यानी दखल घेतली व पंचनामा करण्यात आले आहे.सदर शेतकरी महिला सौ.कांताबाई सोमेश्वर दोनाडकर याना वनविभागाने आर्थिक मदत दयावी अशी मागणी केली जात आहे.


पुढील तपास वनविभागाने कर्मचारी करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !