ब्रम्हपुरी नगरीत अभाविप द्वारा " छात्र महाकुंभ ".
अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : २५/०२/२३ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून ब्रम्हपुरी शहरात २४ फेब्रुवारीला "छात्र महाकुंभ" कुंभ छात्र शक्तिचा विद्यार्थी संमेलन पार पडले. या संमेलनाला ब्रम्हपुरी शहरातील आणि तळोधी, नागभीड,मूल,व सर्व महाविद्यालयांतून 700 विद्यार्थी उपस्थित होते.
संमेलनाच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून सौ. मालतीताई गेडाम सरचिटनीस कल्याण शिक्षण संस्था नागपुर,प्रमुख उपस्थिति मढ़े प्राचार्य अतुल कामडी प्रांत उपाध्यक्ष अभाविप विदर्भ प्रांत,श्री शक्ति केराम प्रांतमंत्री अभाविप विदर्भ प्रांत,प्रमुख अतिथी म्हणून मा.अतुलजी देशकर माजी आमदार ब्रम्हपुरी विधान सभा,मुख्य वक्ता म्हणून अभाविपचे अखिल भारतीय जनजाति विद्यार्थी कार्य सह प्रमुख श्री.राकेशजी पटेल,स्वागत समिती अध्यक्ष डॉ.जयंत पर्वते,स्वागत समिति सचिव श्री.अरविंद नंदूरकर.नगर अध्यक्ष प्रा. प्रशांत मेश्राम आणि नगर सहमंत्री मयूर राजुरवार प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी ब्रम्हपुरी शहरातील शैक्षणिक परिस्थिती आणि वर्तमान सामाजिक परिस्थिती अशा दोन विषयांवर प्रस्ताव पारित करण्यात आले.या प्रस्तावांना विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी अनुमोदन दिले. यावेळी नगरातील रुक्मिणी सभागृह ते फवारा चौक पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.फवारा चौकातिल परिसरात जाहीर सभा झाली.सभेत विविध विषयवार जिल्ह्यातील छात्र नेत्यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचा समारोप प्रांत मंत्री श्री.शक्ति केराम यांच्या भाषणाने झाला.