धनोजे कुणबी समाज मंडळ चंद्रपूर द्वारा आयोजित तीन दिवसीय कृषिमहोत्सव २०२३ चा बक्षीस वितरणाने समारोप.

1 minute read

धनोजे कुणबी समाज मंडळ चंद्रपूर द्वारा आयोजित तीन दिवसीय कृषिमहोत्सव २०२३ चा बक्षीस वितरणाने समारोप.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२३ पासून धनोजे कुणबी  समाज मंदीर, लक्षीनगर चंद्रपुर द्वारा चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजीत कृषी महोत्सवात शेतकरी मेळावा,शेतीविषयक तज्ञांचे मार्गदर्शन, अमृतमहोत्सवी सभासदांचा सत्कार,सरपंच परीषद, उद्योजकता मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी, उपव- वधू परिचय मेळावा,सांस्कृतीक कार्यक्रम अश्या विविध उपक्रमांचा समारोप दि.१२ फेब्रुवारी सायंकाळी बक्षीस वितरणाने समारोप झाला. बक्षीस वितरण राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा.हंसराज अहिर,माजी आमदार सुदर्शन निमकर, मंडळाचे अध्यक्ष ॲड.पुरूषोत्तम सातपुते,मेळावा प्रमूख श्रीधरराव मालेकर,डॉ.गौरकर,उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे,सचिव अतुल देऊळकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. 





अत्यंत शिस्तबद्ध व विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश या कृषि महोत्सवात करण्यात आल्यामुळे प्रत्येक समाजातील घटकांना यातील उपक्रमांचा लाभ झाला. चांदा क्लब ग्राउंड ला तिन दिवस जत्रेचे स्वरुप आले होते. शेती व लघुउधोगावर आधारित लावलेल्या स्टॉल्स ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकंदरीत धणोजे कुणबी समाजा तर्फे आयोजित हा कृषीमहोत्सव दिशादर्शक ठरला. यानिमित्ताने अयोजन समिती व परीश्रमपूर्वक तन मन धनाने सहकार्य केलेल्या समाजबांधवांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !