राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेतर्फे डॉ.परशुराम खुणे सन्मानित.

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेतर्फे डॉ.परशुराम खुणे सन्मानित.


एस.के.24 तास


वडसा : दिनांक : 02 फेब्रुवारी 2023 राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती  आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरनोली शाखेच्या वतीने गुरूनोलीच्या  श्रीहनुमान मंदिर सभागृहात  पद्मश्री पुरस्कारविजेते डॉ.परशुराम खुणे यांचा सत्कार करण्यात आला. 


साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते डॉ.खुणे यांना  स्मृतीचिन्ह,शाल व ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.‌याप्रसंगी सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक सेवादास खुणे,प्रल्हाद पाटील खुणे (आंधळी),यशवंत लंजे (नागपूर),श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी श्री.परसराम मरसकोल्हे,जगन शेंडे,महेंद्र ठलाल,लहुजी किंरगे, जीवन शेंडे,भागवत चौधरी,दिलिप खुणे,रोशन खुणे,क्रीष्णा ठलाल,चंद्रकांत शेंडे,सोहम शेंडे, निलकंठ खुणे,विवेक कापगते आदींची उपस्थिती होती. 


आजवर डॉ. खुणे यांनी  गेल्या ५० वर्षात ८०० नाटकांतून ५००० प्रयोग केले आहे,व्यसनमुक्ती प्रचार,अंधश्रद्धा निर्मूलन,पर्यावरण जनजागृती अभियान,ग्रामविकास कार्यात त्यांनी योगदान दिले आहे.गुरूनोली गावाचे ते १५ वर्ष सरपंच राहिले आहे.‌ झाडीपट्टी नाटकांच्या माध्यमातून मनोरंजनातून लोकप्रबोधन करणारे डॉ.परशुराम खुणे झाडीपट्टीचे महानायक ठरल्याचे यावेळी बंडोपंत बोढेकर म्हणाले.सेवादास खुणे यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. 

सत्काराला उत्तर देताना,डॉ.परशुराम खुणे म्हणाले की,गावकऱ्यांनी आणि श्री,गुरुदेव सेवा मंडळानी केलेला सत्कार मोठा समजतो.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता गावोगावी जावी आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्य गतिमान करण्यासाठी आपण निश्चितपणे सहकार्य करू,असेही ते यावेळी म्हणाले.


सुरूवातीला मंडळाचे नियमानुसार सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.त्यानंतर भजनांचा कार्यक्रम घेण्यात आला.राष्ट्रवंदना गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !