धनोजे कुणबी समाजाच्या वतीने आयोजित "कृषी महोत्सवाचे" ना.मुनंटीवारांच्या हस्ते झाले थाटात उदघाटन.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी 2023 रोजी धनोजे कुणबी समाज मंदीर,वडगाव चंद्रपुर द्वारा चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजीत कृषी महोत्सवाचे उद्घाटक राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधिरभाऊ मुगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.पुरुषोत्तम सातपुते,प्रमुख अतिथी आमदार किशोर जोरगेवार,शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, भाजपा जिल्हाध्यक्ष,देवराव भोंगळे,माजी आमदार सुदर्शन निमकर,वामनराव चटप,संजय धोटे,पुणे येथील महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरण निमंत्रित सदस्य तथा जलद्धन्य सुधिर भोंगळे माजी उपमहापौर राहुल पावडे मेळावा प्रमूख से.नि.मुख्य कार्यकारी अध्यक्ष श्रीधराराव मालेकर व मान्यवर उपस्थित होते.
उद्दघाटनीय,भाषणात ना.सुधिरभाऊ यांनी जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या डोळयातील अश्रु पुसण्यासाठी मला काम करायच आहे. मला शेतकरी यांच्यासाठी सुर्य नाही बनता आले.
तरी शेतकरी यांच्या जीवनातील अंधार दुर करण्यासाठी मी पणती नक्कीच बनणार आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले. शेतीविषयक कृषी महोत्सव मेळाव्याला मोठया संख्येने युवा शेतकरी उपस्थित होते. माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केलेल्या आवाहना ला प्रतिसाद देत कृषी महोत्सवाला राजुरा क्षेत्रातील शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती हे विशेष.