पिंपलखुट येथे मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन स्थापना दिवस साजरा.
एस.के.24 तास
चंद्रपूर : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर संस्थेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा कार्यक्रम मागील अनेक वर्षा पासून सातत्याने राबविला जात आहे.
त्याच अनुषंगाने दि.14 फेब्रुवारी 2023 ला मॅजिक बस फाऊंडेशन ला 24 वर्ष पूर्ण झाले या निमित्याने जिल्हा परिषद उच्च - प्राथमिक शाळा पिंपलखुट येथे मॅजिक बस फाऊंडेशन स्थापना दिवस साजरा करण्यात आला.मॅजिक बस संस्था ही विद्यार्थी,शिक्षक आणि पालकवर्गानंसोबत काम करत असल्यामुळे त्यांच्यासोबत हा दिवस साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात आले. त्यात,रस्सीखेच,पोता रेस,पोट्याटो रेस,कार्ड पेंटिंग,इत्यादी.
या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील सर्व तालुका समन्वयक आणि सर्व शाळा सहाय्यक अधिकारी उपस्थित होते.सोबतच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मॅजिक बस फाऊंडेशन चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे जिल्हा प्रशिक्षक संदिप राऊत, कमर्शियल ऑफिसर,नितीन उपगणलावार,तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना मुसळे,तसेच समस्थ शिक्षक वर्ग उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्याकरिता चंद्रपूर तालुक्याचे शाळा सहाय्यक अधिकारी संदेश चूनारकर,नालंदा बोथले,पायल राजपूत ,गणेश दुधबडे,प्रियंका ठमके,गंगाधर जाधव,यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि विशेष प्रयत्न समूदाय समन्वयक सुलभा जुमनाके यांनी केले.