चांदली जवळ बस पलटी मारल्याने दुचाकी दोन स्वारांचा मृत्यु .

चांदली जवळ बस पलटी मारल्याने दुचाकी दोन स्वारांचा मृत्यु .


राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास


मुल : दुचाकीने राईस मिल मधे कामाला जाण्यासाठी निघालेल्या युवकांचा परिवहन विभागाच्या बस  उलटल्याने त्याच मार्गाने दुचाकीने जाणारे  दोन युवक बस खाली चिरडून जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास बोरचांदली नदीजवळ घडली घडली. संदीप रामदास कोकोडे वय 28 वर्षे,प्रफुल उर्फ भाऊराव गुरनुले वय 24 वर्षे अशी अपघातात (मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहे.

मूल तालुक्यातील मौजा फिस्कुटी येथील संदीप रामदास कोकोडे वय,28 वर्षे,प्रफुल उर्फ भाऊराव गुरनुले वय,24 वर्षे हे एम.एच.34 सी ए 3704 ने मूल येथील राईस मिल मधे कामाला जात होते. परिवहन विभागाची बस क्रं.एम.एच.07 सी 9158 ही बस मूल वरून चामोर्शी ला जात असताना नदीजवळ उलटली.नेमक्या  वेळी हे दोन्ही युवक बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असल्याने काही कळायच्या आत दोघेही बस खाली आल्याने दोघेही जागीच गत प्राण झाले. 


घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन शव उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन शव उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !