तरुण-तरुणी ठार ; एक तरुण गंभीर चॉकलेट डे' साजरा करून परतताना अपघात.

तरुण-तरुणी ठार ; एक तरुण गंभीर चॉकलेट डे' साजरा करून परतताना अपघात.


एस.के.24 तास


सिंदेवाही : सिंदेवाही ते मूल मार्गावरील सरडपार येथील पुलाजवळ दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण व तरुणी जागीच ठार झाले तर दुचाकीवरील तिसरा तरुण गंभीर जखमी झाला.त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 


हा अपघात गुरुवारी रात्री 9 :00 वाजता च्या सुमारास घडला.घटनेनंतर लगेच जखमी व मृतकांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.घरी खोटे सांगून चॉकलेट डे साजरा करण्याकरिता हे तिघेही जण सुमित अलोणे,सेजल कुंभारे सिंदेवाही ला गेले होते. 


तेथून परताना हा अपघात झाल्याची गावात चर्चा आहे.सेजल अनिल कुंभारे (१९) रा.राजोली ता.मुल व सुमित राजू अलोणे (२३) रा.डोंगरगाव ता.सिंदेवाही अशी मृतकांची नावे आहे.तर अक्षय यादव लेनगुरे (२३) हा गंभीर जखमी झाला आहे.या घटनेने राजोली व डोंगरगाव गावावर शोककळा व्यक्त केली जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !