वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी. ★ मुल तालुक्यातील चितेगाव येथिल घटना.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी.


मुल तालुक्यातील चितेगाव येथिल घटना.


राजेंद्र वाढई !उपसंपादक!एस.के.24 तास

मुल : दिनांक,22/02/2023 मुल तालुक्यातील चितेगाव येथिल युवा शेतकरी,महेश नामदेव तोडासे हा आज बुधवारी सकाळी आपल्या शेतात लाखोळी खोदण्यासाठी जात असतानाच वाटेत दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घातली व गंभीर जखमी केले होते.मात्र प्रसंगावधान राखून जखमी महेशने कसेबसे स्वतःला सावरले व वाघाला दूर सारत पटकन जवळच असलेल्या झाडावर चढून बसला व कसाबसा आपला जीव वाचवला.काही वेळाने वाघ निघून जाताच जखमी महेशला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मूल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

गावकऱ्यांनी सततच्या वाघाच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने तातडीने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी ठोस पावले उचलून वाघ,बिबट,अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी उचलून धरली आहे.नुकतेच काही दिवसांपूर्वी मोरवाही येथे अस्वलिने हल्ला करुन एका महिलेला गंभीर जखमी खकेले होते,हे प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा हा हल्ला झाला आहे.

वनविभागाने तातडीने उपाययोजना केली नाही तर जनक्षोभ उसळल्याशिवाय राहाणार नाही, असे परिसरातील जनतेचे म्हणणे आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !