वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर विद्यार्थ्यांसाठी 'स्वयम' ★ विजा,भज प्रवर्गासाठी मिळणार लाभ 900

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर विद्यार्थ्यांसाठी 'स्वयम'


★ विजा,भज प्रवर्गासाठी मिळणार लाभ 900



एस.के.24 तास


गडचिरोली : विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करूनदेखील प्रवेश मिळाला नाही,अशा विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वीनंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना' अंतर्गत शिक्षण घेता येईल.यासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे,असे सहायक समाज कल्याण आयुक्तांनी कळविले.


शासनाने ६ सप्टेंबर २०१९ च्या सुधारित शासन निर्णयान्वये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना सुरू केली आहे. सदर योजनेतून विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाते. योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांना इयत्ता १२वीनंतरचे उच्च शिक्षण मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा,


शिष्यवृत्तीसाठी १३ पर्यंत अर्ज करा : - 


गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ / वरिष्ठ व व्यावसायिक/बिगरव्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात प्रवेशित अनु. जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी ऑनलाइन प्रणालीवर विद्यार्थ्यांची नवीन अर्ज नोंदणी व भरलेले शिष्यवृत्तीचे अर्ज तसेच महाविद्यालयीन स्तरावर अद्यापही भरपूर प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. ज्या महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत समाज कल्याण कार्यालयाकडे मंजुरीकरिता अर्ज सादर केले नाहीत. त्यांना अर्ज फॉरवर्ड करण्याची अंतिम मुदत १३ फेब्रुवारीपर्यंत आहे.

 महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पात्र अर्ज परिपूर्ण तपासणी करून विहित वेळेत अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयाकडे सादर करावेत. महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवरील भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची नवीन अर्ज नोंदणी करण्यासाठी १३ फेब्रुवारी ही शेवटची संधी आहे. याची नोंद प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकांनी घ्यावी,असे सहायक आयुक्तांनी कळविले.


विद्यार्थी हा अभ्यासक्रमांमध्ये स्थानिक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात / शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा, तसेच विद्यार्थ्यांला इयत्ता १२ वीच्या परीक्षेत शेकडा ६० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग ( विजाभज प्रवर्गातील धनगर समाज) प्रथम प्राधान्य असेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विजाभज, इमाव,विमाप्र,कल्याण


विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज मंजूर झालेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे. २०२२-२३ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोली यांच्याकडे अर्ज सादर करावा. अर्जाचा नमुना सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे,असे आवाहन केले.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !