8 ते 11 फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.


8 ते 11 फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.


एस.के.24 तास


चंद्रपूर :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दि. 8 ते 11 फेब्रुवारी 2023 कालावधीत पंडित दिनदयाळ  उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.           


ऑनलाईन  रोजगार  मेळाव्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या  www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर किंवा प्ले-स्टोअर वरील महास्वयंम हे अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे व एम्पलॉयमेंटवर क्लीक करावे. त्यानंतर जॉब सिकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक व पासवर्डने साईन-इन/लॉगीन करावे.


 लॉगीन केल्यानंतर आपल्या प्रोफाइल होम पेजवरील  पंडित  दिनदयाळ  उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर चंद्रपूर हा पर्याय निवडावा. चंद्रपूर जिल्ह्याची निवड करून फिल्टर बटनावर क्लीक करा. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर चंद्रपूर-6 या ओळीतील ॲक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर (व्हॅकन्सी लिस्टींग) क्लीक करून आय ॲग्री हा पर्याय  निवडावा. त्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय करावे.


उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉगईन करुन दि. 8 ते 11 फेब्रुवारी 2023 रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे  आणि उद्योजकांसोबत व्हाट्सॲप, गुगलमिट, व्हिडीओ कॉलींग आदींच्या माध्यमातून संपर्क साधुन ऑनलाईन मुलाखती देऊन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !