25 व 26 फेब्रुवारीला घणसोली येथे नमुंमपा चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन.

25 व 26 फेब्रुवारीला घणसोली येथे नमुंमपा चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन.


एस.के.24 तास नवी मुंबई प्रतिनिधी : दशरथ कांबळे


मुबंई : विविध खेळांमधील प्रावीण्यप्राप्त नवी मुंबईकर क्रीडापटूंना आपली अंगभूत गुणवत्ता सिद्ध करता यावी तसेच त्यांना जिल्हा व राज्यातील उत्तम खेळाडूंचा खेळ अनुभवता यावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

      

या मधील एक महत्वाच्या अशा कुस्तीसारख्या देशी खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद,पुणे यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने दि. 25 व 26 फेब्रुवारी 2023 रोजी सेक्टर 7, घणसोली येथे डी मार्ट च्या मागे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 76 व 105 या शाळेच्या मैदानावर 'नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा' आयोजित करण्यात आलेली.


शनिवार दि. 25 फेब्रुवारी 2023, सायं ४ वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून रविवार दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 7.30 वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे .या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर 74 ते 100 किलो वजनी गटाकरिता रु. 1 लाख रकमेचे प्रथम पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. त्याचप्रमाणे अनुक्रमे 60 हजार, 40 हजार व 30 हजार अशा रकमेची द्वितीय, तृतीय व चतुर्थ पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.


55 ते 65 किलो राज्यस्तरीय वजनी गटात प्रथम क्रमांक रु. 21 हजार तसेच द्वितीय क्रमांक रु. 11 हजार, तृतीय क्रमांक रु. 7 हजार आणि चतुर्थ क्रमांक रुपये 5 हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.राज्यस्तरीय 65 ते 73 किलो वजनी गटात रुपये 25 हजार रकमेचे पहिले पारितोषिक आणि रू 11 हजार, रु 7 हजार व रुपये 5 हजार अशा रकमेची द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिके असणार आहेत.


55 ते 60 किलो कोकण विभागीय स्तर गटात रुपये 11 हजार रकमेचे प्रथम, रु 7 हजार रकमेचे द्वितीय, रु. 5 हजार रकमेचे तृतीय आणि रु. 3 हजार रकमेचे चतुर्थ पारितोषिक प्रदान केले जाणार.55 ते 65 किलो नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र स्तर वजनी गटात रु 11 हजार प्रथम, रु 7 हजार द्वितीय, रु 5 हजार तृतीय व रु 3 हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत


40 ते 50 किलो वजनी गटात नमुंमपा क्षेत्र स्तरावर रु. 5 हजार, रू. 3 हजार, रु 2 हजार व रु. 1 हजार अशी पारितोषिके वितरित केली जाणार आहेत.त्याचप्रमाणे महिलांसाठी देखील विशेष कुस्ती स्पर्धा होत असून त्यामध्ये 55 ते 65 किलो महिला वजनी गटात राज्यस्तरीय स्पर्धेत रुपये 11 हजार रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक रु 7 हजार, तृतीय पारितोषिक रु 5 हजार व चतुर्थ पारितोषिक रुपये 3 हजार प्रदान केले जाणार आहे.


महिला गटामध्ये कोकण विभागीय स्तरावरील 50 ते 55 किलो वजनी गटात रू 7 हजार प्रथम, रु 5 हजार द्वितीय, रू 3 हजार तृतीय आणि रु 2 हजार चतुर्थ रक्कमेचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !