श्री माता महांकाली क्रीडा महोत्सव 2023 चंद्रपूर मधील स्विमींग स्पर्धेत शिवराज मालवी यांना एक सुवर्ण व दोन रजत पदक.


श्री माता महांकाली क्रीडा महोत्सव 2023 चंद्रपूर मधील स्विमींग स्पर्धेत शिवराज मालवी यांना एक सुवर्ण व दोन रजत पदक.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : दिनांक,२८/०२/२३ चंद्रपूर येथील लोकप्रिय आमदार मा.किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने श्री माता महाकाली  क्रीडा महोत्सव- 2023 चे आयोजन दिनांक 25 व 26 फेब्रुवारी 2023 ला जिल्हा क्रीडा स्टेडियम चंद्रपूर येथे करण्यात आले होते. ‌क्रिडा महोत्सवात एकुण 21 प्रकारच्या क्रिडांचा समावेश होता, त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे हजारोंच्या संख्येने खेळाडू आले होते त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुल ला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले व संपूर्ण जिल्ह्यात खेळाची जागृती निर्माण होऊन खेळाडूंमध्ये नवीन उत्साह निर्माण झाले.


 क्रीडा महोत्सव 2023 मध्ये रविवार दिनांक 26 फेब्रुवारी ला खुल्या स्विमींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे ब्रह्मपुरी येथील 60 वर्षिय  शिवराज मालवी यांनी खुल्या स्विमींग स्पर्धेत  सहभाग घेतला व आपल्यापेक्षा अर्ध्या व अर्ध्यापेक्षा कमी वयाच्या तरुणांसोबत स्पर्धेत सहभागी होऊन 200 मिटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्ण पदक, 200 मिटर ब्रेस्टस्ट्रोक मध्ये रजत पदक व 100 मिटर ब्रॅकस्ट्रोक मध्ये रजत पदक मिळविले.


असे एकूण 3 पदकं ,एक सुवर्ण व दोन रजत पदक प्राप्त करून स्विमींग स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले तसेच स्वताची पदकं प्राप्त करण्याची परंपरा कायम ठेवली व स्विमींग स्पर्धेची आपली जिज्ञासा कायम ठेवली याबद्दल त्यांचे स्वतः आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर जिल्हा स्विमींग असोसिएशन चे पदाधिकारी,व आफिसीयल यांनी अभिनंदन केले तसेच सर्व त्यांचे  स्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !