हिरापूर येथे WCL च्या सौजण्याने आरोग्य शिबीर संम्पन्न ; ग्रामपंचायत हिरापूर चा पुढाकार.
एस.के.24 तास
कोरपना : तालुक्यातील हिरापूर येथे WCL पैनगंगा परियोजना विरूर (गाडे) यांचे सौजण्याने हिरापूर येथे दिनांक 14.1.2023 रोज शनिवार ला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात गावातील 280 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.
यासाठी हिरापूर ग्रामपंचायत चे माजी सरपंच तथा सदस्य प्रमोद कोडापे यांनी वे.को.ली महाप्रबंधकांना पत्राद्वारे खान बाधित गावामध्ये आरोग्य शिबिराच्या आयोजनाची मागणी केली होती.त्या अनुषंगाने हिरापूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य पथकामध्ये डॉ.पराग पांडे,डॉ.सुवर्णा मानकर,csr प्रमुख अमित सिहं,संजय ताजने, हर्षद जेणेकर,अजय चटकी,कवडू हुलके,धर्मेंद्र जाट,उषा हुलके,शिला इसरप,राकेश कुरेकर उपस्थित होते.
यावेळी सरपंच सौ.सुनीता तुमराम,उपसरपंच अरुण पा.काळे,ग्रा.पं.सदस्य प्रमोद कोडापे ग्रा. पं. सदस्य दुर्योधन सिडाम,तंटामुक्ती अध्यक्ष भास्करराव विधाते,जेष्ठ नेते गणपत पाटील काळे, माजी सरपंच मुरलीधर बलकी,वाघमारे गुरुजी, समशेर शेख,मोहन तुमराम,कुलदीप पडवेकर, गंगाधर मडावी,मिलिंद खाडे,अर्जुन पंधरे,महादेव चौथाले,महादेव वाघमारे,देविदास वाघमारे,ग्रा. पं.संगणक परिचालक,पेसा मोबीलाईझर सुवर्णा सिडाम,सचिन बोढे,शिपाई सूरज आत्राम आदीनी सहकार्य केले.