समन्वयाने धम्म चळवळ अधिक गतिमान करणे आवश्यक. ★ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. मनोहर नाईक यांचे प्रतिपादन.

समन्वयाने धम्म चळवळ अधिक गतिमान करणे आवश्यक.


आंबेडकरवादी विचारवंत डॉ. मनोहर नाईक यांचे प्रतिपादन.


नरेंद्र मेश्राम : प्रतिनिधी


भंडारा : प्रस्थापित व्यवस्थेने मूलनिवासी असलेल्या अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व भटक्या विमुक्तांना गुलाम बनविले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास करून बौध्द धर्माचा स्वीकार केला तसेच भारतीय राज्यघटनेचे माध्यमातून सर्वांना अधिकार बहाल केलेले आहेत पण धम्माच्या प्रचार व प्रसाराचे कार्य पाहिजे त्याप्रमाणात होताना दिसत नाही याकरिता समन्वयाने धम्म चळवळ अधिक गतिमान करणे आवश्यक असल्याचे भारतीय बौध्द परिषद सर्कल कनेरी/दगडी चे वतीने सम्यक बुद्धविहार, समता भूमी गुरढा येथे आयोजित धम्म संमेलनात आंबेडकरवादी विचारवंत डॉ.मनोहर नाईक यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित बौध्द उपासक,उपसिकांना केले. 


भारतीय बौध्द परिषद सर्कल कनेरी/ दगडी चे वतीने सम्येक बुध्दविहार समता भूमी गुरढा येथे दानशूर स्मुर्तिशेष शकुंतला अंबादास कानेकर यांचेकडून दान स्वरूपात मिळालेल्या भूमीवर रविवारी (ता २९) ऐतिहासिक ४९ व्या धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी प्रथम सत्रात धम्मरैली, धम्म ध्वजारोहन,भिक्खु संघाकडून वंदना,भिक्खु संघाला भोजनदान, चिवरदान,अष्टपरिस्कर दान करण्यात आले. त्यांनतर भिक्खु धन्नास्वामी अरुणाचल प्रदेश, भिक्खु बुद्घरत्न स्थविर बुलढाणा,भिक्खु महेंद्र नागपूर व भिक्खु आनंद आलेबेदर (साकोली) यांचेकडून धम्मदेशना देण्यात आली. 


दुपारी 2 : वा,द्वितीय सत्रात सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.उद्घाटक बुध्द विहार समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष महिंद्र बारसागडे मुंबई,अध्यक्षस्थानी अखिल भारतीय तांडा सुधार समिती नागपूरचे अध्यक्ष डॉ.प्रकाश राठोड,प्रमुख मार्गदर्शक आंबेडकरवादी कवी समीक्षक व विचारवंत डॉ मनोहर नाईक, आंबेडकरी विचारवंत डॉ सर्जनादित्य मनोहर, आंबेडकरी लेखक प्रसन्नजित गायकवाड,बानाई नागपूरचे माजी अध्यक्ष इंजिनियर पी.एस. खोब्रागडे,प्रमुख अतिथी सरपंच किशोर घरट,पोलिसपाटील विलास मोहतुरे,तमुस अध्यक्ष किशोर मोहतुरे,साहित्यिक व कवी हरीशचंद्र लाडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.


मान्यवरांनी धम्म संस्कृती आणि आंबेडकरवादी समाज,धम्म संस्कृतीच्या ध्येयातील भारत, धम्मक्रांती आणि आजचे वास्तव याविषयावर मार्गदर्शन केले पण सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमात उपस्थितीबाबद चिंताही व्यक्त केली.धम्म संमेलनाचे प्रास्ताविक सर्कल अध्यक्ष प्राध्यापक तारेश शहारे,सूत्रसंचालन सुप्रिया रंगारी  तर आभार आर्शी फुल्लुके यांनी मानले.धम्म मेळाव्याचे यशस्वीतेसाठी दिनेश देशपांडे,अनिल मेश्राम,अजित रंगारी,सिद्धार्थ मेश्राम,सुकेसिनी नागदेवे,यांचे सह कार्यकारिणी सदस्य व गुरढा ग्रामवासियांनी अथक परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !