रनमोचन जि.प.उच्च प्राथमिक शाळेत शहीद बालक स्मृतिदिनी वाहिली अनेकांनी आदरांजली.

रनमोचन जि.प.उच्च प्राथमिक शाळेत शहीद बालक स्मृतिदिनी वाहिली अनेकांनी आदरांजली.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रह्मपुरी  : दिनांक,२२/०१/२३ बरडकीन्ही येथून शालेय बिटा अंतर्गत पार पडलेल्या क्रीडा संम्मेलनात विजयश्री प्राप्त करून रनमोचन गावाकडे परत येत असतांना रुई विद्यानगर जवळ सन 1999 मध्ये ट्रॅक्टर मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनिडोरने धडक दिल्याने शांताराम नवलाजी राऊत, प्रदीप वामन ठाकरे, प्रकाश शंकर ठाकरे, प्यारेनंद पंढरी शंभरकर या चार बालकांचा जागीच मृत्यू झाला होता तर जवळपास 30 मुले जखमी झाले होते. या घटनेने गांगलवाडी बीटातील व बेटाळा केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावासह संपूर्ण ब्रह्मपुरी तालुक्यात शोककळा पसरली होती. ब्रह्मपुरी तालुक्यातील जवळपास बऱ्याच शाळेत आजही हा काळा दिवस म्हणून पाळला जातो.


दरवर्षी 22 जानेवारीला रणमोचन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने शहीद बालक स्मृतिदिन कार्यक्रमआयोजित केल्या जातो .सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून शहीद बालक स्मृतिदिन दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम शहीद बालकांच्या स्मृति स्तंभाला दीपप्रज्वलनाने व माल्यार्पणाने  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर अपघातात ठार झालेल्या चारही शहीद बालकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. 


       सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रणमोचन ग्रामपंचायतच्या सरपंच नीलिमा राऊत ह्या होत्या. तर विशेष अतिथी म्हणून उपसरपंच सदाशिवराव ठाकरे, शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष योगेश पिलारे, पत्रकार विनोद दोनाडकर,पोलीस पाटील अस्मिता पिलारे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाजी पिलारे,ग्रामपंचायत सदस्या मंदा साहारे, कोमल मेश्राम,वामनजी ठाकरे,नवलाजी राऊत, शेंभरकरताई,वंदना राऊत,विनीता ठाकरे,मेश्राम ताई,मुख्याध्यापक झुरमुरे सर,किरमिरे सर, शेडमाके सर,राऊत सर, शिक्षिका अनुज खोब्रागडे,व गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीं यावेळी उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरमिरे सर यांनी केले.तर आभार शेडमाके यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळा शिक्षण समिती, सहाय्यक शिक्षक,स्वयंपाकी-मदतनीस कल्पना उदासी यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !