शिक्षकांनी कठोर परिश्रमांतून आत्मनिर्भर विद्यार्थी घडवून पालकांमध्ये विश्वास निर्माण करावा - माजी आमदार,सुदर्शन निमकर
विशाल बांबोळे!कार्यकारी संपादक!एस.के.24 तास
राजुरा : सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित, वरुर (रोड) तालुका राजुरा येथील इंदिरा गांधी माध्य.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया च्या प्रांगणात 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तीन दिवसीय शालेय क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घघाटन सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर चे उपाध्यक्ष माजी आमदार सुदर्शनभाऊ निमकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य अतिथी ज्येष्ठ नागरिक शाळेकरीता जमीन दान दिलेले दानशूर माननिय मुर्लीधर पाटील धोबे, मुख्याध्यापक रामदास गिरडकर, भारतीय जनता पक्षाच्या पंचायत राज व ग्रामविकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक प्रदिप बोबडे,वरुर ग्रा.पं.चे सरपंच गणपत पंधरे,टेंबुरवाही ग्रा.पं. सरपंच रामकृष्ण मडावी,भेदोळा ग्रा.पं.सरपंच सौ. उषाताई टेकाम,वरुर ग्रा.पं.उपसरपंच सौ. विजयाताई करमणकर,सदस्य रविंद्र सोयाम, सोनूर्ली ग्रा.पं.सदस्य राहुल साळवे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.रज्जुताई वैरागडे, उपाध्यक्ष येलय्या दय्यालवार व मान्यवरांच्या उपस्थितित उद्घघाटन सोहळा संपन्न झाला.
उद्घघाटनपर भाषणात माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शिक्षकांनी कठोर परिश्रमांतून विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य घडविनारे व आत्मनिर्भर होत असल्याचा पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात स्वताःचा सर्वांगीण विकास करावा.स्वताचे व आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करून नावलौकिक करावा
व आपल्या गावाच्या व राष्ट्राच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हावे, असे उपस्थित शिक्षक,विध्यार्थि व पालकांना संबोधून विचार व्यक्त केले. याप्रसंगी मंडळा चे उपाध्यक्ष,माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते या परिसरातील नुकत्याच झालेल्या ग्रा.पं.निवडणूकीत निर्वाचित झालेल्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांचा विद्यालयाच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थांची प्रचंड उपस्थिती होती.