कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल स्पोर्ट्स फाॅर गर्ल प्रोग्राम अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन.


कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल स्पोर्ट्स फाॅर गर्ल प्रोग्राम अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन.


एस.के.24 तास


चंद्रपूर " कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल स्पोर्ट्स फाॅर गर्ल प्रोग्राम " अंतर्गत कबड्डी खेळाचे स्पर्धा जिल्हा परिषद  माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल राजुरा येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उद्घाटक तथा कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून मा.ए.एस.घोनमोडे कनिष्ठ अधिवक्ता हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित मा.ए.जी चौघुडे सर कनिष्ठ अधिवक्ता,मा चहारे सर,मा भाग्यश्री क्षिरसागर मॅडम,मा संजय चिंडे सर उपस्थीत होते.

मा.घोनमोडे सरांनी अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले की,कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल यांनी मुलींना चांगली संधी निर्माण करून दिली आहे. त्यामुळे त्यांना खेळातील करीयर करायला जागा निर्माण झाली आहे. तसेच त्यांना करीयर करायचे असल्यास विविध स्पर्धा खेळायला मिळाले पाहिजे. मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर ने ही संधी निर्माण करून दिली आहे.

उद्घाटनिय पहिला सामना जिल्हा परिषद हायस्कूल राजुरा विरूद्ध आदर्श हायस्कूल राजुरा यांच्यामध्ये घेऊन स्पर्धा सुरू करण्यात आली.या स्पर्धेमध्ये गुरूनानक विद्यालय विरूर स्टेशन या संघाने प्रथम क्रमांक पटकावला,द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद हायस्कूल राजुरा यांनी पटकावला,तर तृतीय क्रमांक शिवाजी हायस्कूल राजुरा यांनी पटकावला.


विजयी संघाचे कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल च्या सहकार्याने मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर च्या वतीने प्रोजेक्ट लीड अरूण मोहिते यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण मोहिते यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !