जि.प.शाळा जिबगांव येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण.

जि.प.शाळा जिबगांव येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण.



"२६ जाने.प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येवर.,विद्यार्थांच्या.विविध स्पर्धाचे आयोजन.



सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास



सावली : जि प शाळा जिबगांव येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन आज (24जाने) सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे उद्घाटन ,जिबगांव चे सरपंच पुरुषोत्तम चुदरी ,तर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश चुदरी  यांनी भुषविले,यावळी ग्रा.पं.सदस्य,राकेश गोलेपल्लीवार,लिलाबाई भोयर राजु देशमुख,सोमाजी आगरे, राजेंद्र चुदरी,निकुर सर,वायकोर सर शाळा व्यवस्थापन समिती तथा गावकरी मोठ्या प्रमाणात  आदी ची उपस्थित होते.


गेल्या अडीच वर्षामध्ये कोरोना संकटामुळे देशासह राज्यातील शाळा ,कान्हेंट,महाविद्यालये बंद होती, विद्यार्थी घरीच राहुन आनलाईन शिक्षणाचे धडे अन्डा्ईड मोबाईल वरती घेत होते,या द्वारे शिक्षण दिले  जात.असले तरी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांवा वाव मिळत नव्हता, त्यांच्या अंगी असलेले विविध गुण दिसून येत.नव्हते, २०२२ वर्षात कोरोना संकट कमी झाले आणि विविध सण,उत्सव,धार्मिक, सामाजिक ,कार्यक्रम घेतल्या जात आहेत, २६ जानेवारी ,गणराज्य दिनाच्या पुर्व संध्येवर जि प शाळा जिबगांव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यात एकल.नृत्य, समुह नृत्य, देशभक्ती गिते , आदी कार्यक्रम घेण्यात ,लहान चिमुकल्या मुलांच्या नृत्याने प्रमुख अतिथि सह ,पालक प्रेक्षक वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले.


सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक वायकोर,केंद्रप्रमुख रक्षमवार,यांनी परिश्रम घेतले ,यावेळी संचालन रक्षमवार सर,आभार दुबे सर यानी केले विद्यार्थांच्या आई वडीलासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !