ट्रॅक्टर दुचाकी अपघातात पती ठार तर पत्नी जखमी. ★ मुल उमा नदी बोरचांदली पुलाजवळील घटना.



ट्रॅक्टर दुचाकी अपघातात पती ठार तर पत्नी जखमी.


★ मुल उमा नदी बोरचांदली पुलाजवळील घटना.


नितेश मँकलवार!उपसंपादक!एस.के.24 तास


मुल : नवीन वर्षाचे सर्वत्र स्वागत होत असताना आनंदी वातावरण उत्साहाची रेलचेल करण्याच्या वेळेस अचानक दुःखाचा डोंगर जर एखाद्या कुटुंबावर येत असेल तर यांच्यासारखी दुर्दैवी घटना आणखी दुसरी काय असू शकते.असाच प्रसंग १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० वा.मुल बोरचांदली मार्गांवर घडला असून आगळे कुटुंबियांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

घटनेचे सविस्तर वृत असे की,रविवारला सकाळी १० चे दरम्यान मुल चामोर्शी मार्गावर मुल पासून दीड की.मी.अंतरावर उमा नदी आहे.नदीच्या पुलावर दोन्ही साइडला कठडे नाही.ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.मागील वर्षी सुद्धा पावसाळ्यात अशीच एक घटना घडली होती.

तेव्हाच उमा नदीच्या पुलावर दोन्ही साइडला कठडे करावे अशी मागणी जनतेकडून करण्यात आली होती.कदाचित बांधकाम विभागाने कठडे लावले असते.तर आगळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला नसता.पण विभागाने दुर्लक्ष केल्यानेच बिचाऱ्या गणपत मारोतराव आगळे वय (५४) यांचा ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघात झाला. आणि गणपत जागेवरच जिव गेला.व पत्नी सौ.सुरेखा ही गंभीर जखमी असून उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 

मुल येथील गणपत आगळे हा नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३४ ए.पी.६९२२ या गाडीने पत्नीला (सौ.सुरेखा) हिला घेऊन मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जात होते.  वाटेतच उमा नदी असल्याने घरी देवाला विहीलेले फुल निर्माल्य नदितच विसर्जित करण्याच्या हेतूने पुलावर थांबले अशातच मुल कडून चामोर्शी मार्गे जाणारी ट्रॅक्टर (मुंडीला क्रमांक नाही) ट्रॉली क्रमांक : एम.एच.33 ए.एफ.4064 निळ्या रंगाची स्वराज माडेल ट्रॅक्टरने पुलावर धडक दिली.

असता ट्रॅक्टर सह गणपत नदीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तर ट्रॅक्टर चालक किशोर पोरटे जखमी असून त्यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मुल पोलिसांना खबर मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मोका चौकशी करून मृतकाची बाडी शवव्छेिदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास मुल पोलिस निरीक्षक सतिषशिंह राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.कोसमशिले करीत आहेत.

 ऐन नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपत आगळे मृत झाल्याने गणपत हा सर्वांसोबत मित्रत्वाच्या नात्याने वागणारा असल्याने मुल नगरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांचे पश्चात पाच भाऊ,पत्नी, दोन मुल एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !