कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल आणि मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे कब्बडीचे आयोजन.



कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल आणि मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनतर्फे कब्बडीचे आयोजन.

 

राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास


मुल : कॅडबरी डेअरी मिल्क गुड लक गर्ल आणि मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन च्या सहकार्याने मौजे गाव जामतुकुम येथे गावातील मुलींच्या व महिला पालकांच्या कब्बडी स्पर्धा मा.सरपंच बोधालकर साहेब यांच्या सहकार्याने जि प उच्च प्राथमिक शाळा जामतुकुम जवळच्या मैदानावर पार पाडल्या. त्यावेळी प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून मा. हेमंत भिंगारदिवे बीडीओ पंचायत समिती पोंबुर्णा, मा . निमोड साहेब तालुका कृषि अधिकारी  पंचायत समिती पोंभूर्णा,मा.डॉ.शहा CHO मा.कलिऐ साहेब कृषी सहायक अधिकारी पोंभुर्णा मा.डाॅ.मामेडवार साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी,मा.T.N साहेब उपसरपंच पोंबुर्णा,मा.मोगरकर साहेब देवाडा खुर्द सरपंच ,मा.टि.एन. शेंडे यांच्या उपस्थितीत पार पाडल्या

त्यावेळी महिला पालकांच्या कब्बडी स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक महिला कबड्डी पालक संघ जामतुकूम व बेस्ट डिफेंडर जयश्री मंगेश वाढई द्वितीय क्रमांक महिला कबड्डी पालक संघ कसरगट्टा व बेस्ट रेडर वैशाली पाटील तर तृतीय क्रमांक महिला कबड्डी पालक संघ केमारा यांनी पटकाविला.

गावातील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक वेळवा मुलींचा कब्बडी संघ व बेस्ट डिफेंडर सायली इंगोले द्वितीय क्रमांक घाटकुल मुलींचा कबड्डी व बेस्ट रेडर मयुरी उपासे तृतीय क्रमांक जामतुकुम मुलींचा कब्बडी संघ यांच्या 

या स्पर्धा घेण्याच्या उद्देश असा होता की गावातील मुलींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच महिलांना सुध्दा आपली खेळाची आवड जपली पाहिजे तसेच खेळामुळे आरोग्य सुदृढ निरोगी राहण्यासाठी मदत होते तसेच मुलींना खेळांमध्ये करीयर करायचे संधी दिली पाहिजे तसेच अल्पवयात लग्न न करता ते वय वाढू शकते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई खेळली तर ती मुलीला खेळण्यासाठी पाठवेल तीला जर खेळाचे महत्त्व माहीत झाले तर ती मुलीला खेळण्यासाठी पाठवेल असे आम्हाला वाटते म्हणून हा सर्व सोहळा घडवून आणला होता.

या करीता मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर चे सिनीयर प्रोग्राम मॅनेजर मा प्रशांत लोखंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !