पवाचकांचा विश्र्वास टिकविण्यासाठी प्रयत्न करा.- प्रा. महेश पानसे. द गडविश्व व लोकवृत्त न्युज पोर्टल तर्फे पत्रकार दिनानिमित्त " डिजिटल मीडिया कार्यरत पत्रकारांचा परिचय मेळावा व सत्कार संपन्न. ★ राज्य पत्रकार संघा तर्फे पत्रकार दिन साजरा.


वाचकांचा विश्र्वास टिकविण्यासाठी प्रयत्न करा.- प्रा. महेश पानसे.

द गडविश्व व लोकवृत्त न्युज पोर्टल तर्फे पत्रकार दिनानिमित्त " डिजिटल मीडिया कार्यरत पत्रकारांचा परिचय मेळावा व सत्कार संपन्न.


★ राज्य पत्रकार संघा तर्फे पत्रकार दिन साजरा.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


गडचिरोली : 'दर्पनकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी पत्रकार दिन म्हणून साजरी करण्याची परंपरा अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. 


राज्य मराठी पत्रकार संघ व डिजीटल मिडीया तर्फे आयोजन दिनांक,६ जानेवारी २०२३ द गडविश्व व लोकवृत्त न्युज पोर्टल तर्फे पत्रकार दिनानिमित्त " डिजिटल मीडिया कार्यरत पत्रकारांचा परिचय मेळावा संपन्न झाला.यात  पत्रकारांचा सत्कार शिल्ड देऊन करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष - प्रा.महेश पानसे पूर्व विदर्भ अध्यक्ष,म.राज्य मराठी पत्रकार संघ, मुबंई  

प्रमुख पाहुणे,रूपराज वाकोडे,म.राज्य मराठी पत्रकार संघ,जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली रोहिदास राऊत - जेष्ठ पत्रकार तथा संपादक " डी.वाईस न्युज " तुळशीरामजी जांभूळकर - महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,माहिती अधिकार - पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना,जितेंद्र चोरडिया कार्याध्यक्ष राज्य पत्रकार संघ शाखा, चंद्रपूर आशिष रैच - चांदा ब्लास्ट, उपसंपादक,मोरेश्वर उधोजवार - खरे वृत्तांत न्युज संपादक,खोमदेव तुम्मेवार,महाराष्ट्र मत न्युज 24 तास मुख्य संपादक,सुरेश कन्नमवार,मुख्य संपादक - एस.के.24 तास कार्यक्रमाचे आयोजक,सचिन जीवतोडे, मुख्य संपादक,द गडविश्व,निलेश सातपुते,मुख्य संपादक,लोकवृत्त न्युज कार्यक्रम सोहळ्यास उपस्थित होते. 


आचार्य,बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अध्यक्षीय व मार्गदर्शन भाषणात वाचकांचा डिजीटल मिडीयावर विश्र्वास वाढत असून हा विश्र्वास टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी व डिजीटल मिडीयाचे संपादक / पत्रकार उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !