अ-हेर नवरगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा.
अमरदीप लोखंडे!सह संपादक!एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : २७/०१/२३ ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत अ-हेरनवरगाव येथील पटांगणातिल ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच्या सौ. दामिनी चौधरी यांनी केले.
याप्रसंगी सचिव चौधरी,उपसरपंच जितेंद्र क-हाडे, श्रीकांत पीलारे ग्रामपंचायत सदस्य,सदस्या, कर्मचारी वृंद तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,विकास विद्यालय,अ-हेरनवरगाव मुख्याध्यापक, शिक्षक वृंद,विद्यार्थी,पालक प्रतिष्ठित नागरिक वामनरावजी मिसार,सेवानिवृत्त सैनिक सुभाष ठेंगरे,सौ.पूनम ठेंगरे,संघमित्रा लोखंडे,तंटामुक्ती अध्यक्ष,अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
ध्वजारोहणा नंतर सेवानिवृत्त सैनिक सुभाष ठेंगरे ,आणि देशाची सेवा करत असलेले सैनिक प्रदीप ठेंगरे यांचा शाल,श्रीफळ,देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आणि विकास विद्यालय,अ-हेर नवरगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावरती नृत्य सादर करून लोकांची मने जिंकून घेतले.आणि जनतेने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांवरती कौतुकाचा वर्षाव केला.