वाघाच्या हल्ल्यात युवक जखमी. ★ केरोडा येथील शेतशिवारातील घटना.

वाघाच्या हल्ल्यात युवक जखमी.


केरोडा येथील शेतशिवारातील घटना.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाघाचे हल्ले सुरूच आहे.गाव खेड्यातील जनता भयभीत झाले आहे.काल दिनांक,10/01/2023 मंगळवारी दु.4:00 वा.च्या दरम्यान घटना घडली.

मनोज शालिकराम कुमरे वय,38 वर्ष केरोडा यांच्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले.मनोज कुमरे हे आपल्या शेतात काम करत होते.

तो शौचास बसला असता दब्बा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून जखमी केले.त्यांची पत्नी तसेच शेजारच्या शेतकऱ्यांनी आरडाओरोड केल्याने वाघाच्या तावडीतून निसटता आले. 

वाघाने मनोज च्या पायावर हल्ला केल्याने झटापट झाली.शेतकरी आरडाओरडा करीत धावून आल्याने मनोज जीव वाचला.त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले.

पुढील तपास सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रवीण विरुटकर यांच्या मार्गदर्शनात व्याहाड खुर्द चे क्षेत्र सहाय्यक आर.एम.सूर्यवंशी व वनरक्षक करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !