व्याहाड (खुर्द) प्रेमी युगलांच सामाजिक मंदिरातच "शुभ मंगल सावधान "

व्याहाड (खुर्द) प्रेमी युगलांच सामाजिक मंदिरातच "शुभ मंगल सावधान "


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


सावली : आम्ही दोघेही एकमेकावर जिवापाड प्रेम करतो, आम्हाला लग्न करायचे आहे असे सांगत एक जोडपं चक्क व्याहाड खुर्द च्या सामाजिक कार्यकर्ते यांची भेट घेत आले.या प्रेमी युगलांची भावना लक्षात घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी व गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी देखील दोघांचा चक्क सामाजिक मंदिरातच विवाह लावला.

घरून पळून आलेल्या एका प्रेमी युगलांचा विवाह सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील हनुमान मंदिरात पार पडला.गडचिरोली जिल्ह्यातील एका २२ वर्षीय तरुणीच गावातील एका ३२ वर्षीय युवकासोबत प्रेम जडले.प्रेमाच्या आणाभाका घेत दोघे घरातून लग्न करण्यासाठी बाहेर पडले. 

मात्र मुलीकडच्या घरच्या मंडळीला हे लग्न मान्य नसल्याने या प्रेमी युगुलाने व्याहाड खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपुरे यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रायपुरे यांनी या दोघांची संपूर्ण हकीकत व शालेय टीसी नुसार यांचे वय योग्य आहे की नाही हे पडताळून घेतले. टी.सी नुसार दोघांचे वय हे लग्न करण्यास योग्य,सक्षम व सज्ञान आढळून आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रायपुरे यांनी प्रेमी युगलांना सर्व प्रथम समज दिली की आई वडिलांच्या विरोधात जावून लग्न करणे हे योग्य नाही,

 परत एकदा शांततेने विचार करून घ्या आणि आपलं योग्य भविष्य घडवा असाही सल्ला देण्यात आला. परंतु प्रेमी युगलांच प्रेम हे ‘जियेंगे एक साथ तो मरेंगे एकसाथ’ हि भूमिका घेत ठाम होते. या दोघांची परिस्थिती लक्षात घेता कुटुंबीयाकडून नववधूला त्रास देणार तथा होणार नाही अशी हमी मुलांकडून घेत गावातील तंटामुक्ती समिती, सरपंच व गावातील प्रतिष्ठीत नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत व साक्षीने हिंदू विवाह पद्धतीने मंगलाष्टक म्हणत लग्न लावून देण्यात आले व शुभ आशीर्वाद देण्यात आले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपुरे, सुनीताताई उरकुडे सरपंच व्याहाड खुर्द,सुभाष कर्णेवार तंटामुक्ती अध्यक्ष,डॉ.षडाकांत कवठे माजी तंटामुक्ती अध्यक्ष,पुंडलिक मडावी ग्रा.प. सदस्य, गिरीधर कथले,राहुल रायपुरे,किशोर उंदिरवाडे,डॉ.कुमदेव उरकुडे व गावातील नागरिक हे बहुसंख्येने उपस्थित होते. 


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !