पत्रकार दिन व बॅरिस्टर गिरीश बाबू खोब्रागडे यांचा स्मृतिदिन साजरा.

पत्रकार दिन व बॅरिस्टर गिरीश बाबू खोब्रागडे यांचा स्मृतिदिन साजरा.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : ०८/०१/२३ स्थानिक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बी.डिएड कॉलेज च्या सभागृहात आंबेडकर चळवळीचे निष्ठावंत सरसेनापती बॅरिस्टर गिरीश बाबू खोब्रागडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन व स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा प्राचार्य सन्माननीय देवेश जी कांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचे सदस्य तथा दैनिक सकाळचे उपसंपादक केवळ जीवन तारे नागपूर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मपुरीचे पवन पर्व साप्ताहिक संपादक श्री जीवन बागडे,पत्रकार प्रशांत डांगे व वासनिक उपस्थित होते.

दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर व बॅरिस्टर गिरीश बाबू खोब्रागडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पाहुणे व पत्रकार बंधू यांनी विनम्र अभिवादन केले.ब्रह्मपुरी येथील सेवा जेष्ठ श्री,प्रा.संजय लांबे, डॉ.प्राध्या.कवी धनराज जी खानोरकर,नेताजी मेश्राम,जीवन बागडे,केवळ जीवन तारे,प्राध्यापक मुळे,शिनखेडे सर,प्राध्यापक मिश्रा या पत्रकारांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !