मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे समुदाय समन्वयकांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे समुदाय समन्वयकांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : मॅजिक बस संस्थेचे वरीष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व  जिल्हा प्रशिक्षण अधिकारी मा, संदीप राऊत सर यांच्या नियंत्रणात चालत असलेल्या जीवन कौशल्य उपक्रम मागील काही वर्षांपासून चंद्रपूर तालुक्यात 71 शाळेत अविरतपने राबविला जात आहे.. त्याच अनुषंगाने गावागावात काम करणारे समुदाय समन्वयक यांची दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक 07 जानेवारी ते 8 जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृह येथे  घेण्यात आली.

प्रत्येक विद्यार्थाना त्यांच्या जीवनात असलेले शिक्षणाचे महत्त्व व जीवन कौशल्य शिक्षणाचे महत्व समजणे गरजेचे असून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यास ते आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून जीवनात यशस्वी होतील असा विद्यार्थी घडविण्याचे  हा ध्येय समोर ठेऊन चंद्रपूर जिल्ह्यात संस्थेचे कार्य सुरू असून चंद्रपूर तालुक्यामध्ये स्केल प्रकल्प अंतर्गत 7307 विद्यार्थाना जीवन कौशल्य शिक्षण दिल्या जात आहे. याबद्दल च प्रशिक्षण यांना मिळावं आणि गावामधे शाळेमध्ये आणखी कसं काम करता येईल याबाबत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 

या कार्यशाळेमध्ये स्वयंसेवक कसा असावा, मॅजिक बस इतिहास,ध्येय,दृष्टिकोन,समूदाय प्रतिबद्धता धोरण,भारतीय संविधान प्रस्तावना,हक्क व अधिकार,कर्तव्य, जबाबदाऱ्या,बाल संरक्षण आणि संरक्षण धोरण तसेच गावातील समस्या शोधून त्या समस्या कशा पद्धतीने सोडवणार यासाठी प्रात्यक्षिक घेऊन त्यांना त्यांच्या गावातील असलेल्या समस्या सोडविण्याचा कार्य देण्यात आले.

 या प्रशिक्षणात चंद्रपूर तालुक्यातील  गावातील एकूण 34 समूदाय समनव्यक मोठ्या प्रमाणत उपस्थित होती हे प्रशिक्षण चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशिक्षण अधिकारी माननीय संदिप राऊत यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.तर हे प्रशिक्षण संदेश चुनारकर,नालंदा बोथले, गणेश दुधबळ,पायल राजपूत,गंगाधर जाधव,प्रियांका ठमके शाळा सहायक अधिकारी चंद्रपूर यांनी घेतली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !