भाजपा महिला आघाडी राजुरा तर्फे महिला कार्यकर्ता मेळावा तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न.
★ भाजपा महिला कार्यकर्त्यांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हायची हीच वेळ - माजी सभापती सुनील उरकुडे.
एस.के.24 तास
राजुरा : इथे भारतीय जनता महिला आघाडी तर्फे संक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकवाचा यशस्वीरीत्या कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामध्ये राजुरा तालुक्यातील भारतीय जनता महिला आघाडीच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन जी. प. चे माजी सभापती तथा तालुकाध्यक्ष भाजप सुनील उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच भाजपा नेते तथा माजी नगरसेवक राजू डोहे,पंचायतराज व ग्रामविकास चे प्रदीप बोबडे,दिपक झाडे उपस्थित होते.त्याप्रसंगी बोलताना सभापती यांनी सांगितले.
की भाजपा च्या महिला कार्यकर्त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याची हीच वेळ असून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात आपण थेट जनतेपर्यंत पोहचून समाजसेवा करू शकतो तसेच आपल्यातील नेतृत्व कौशल्य दाखविण्यासाठी भारतीय जनता पक्ष हेच माध्यम आहे. भारतीय जनता पक्ष हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अतोनात प्रयत्नशील असून केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मिळून अनेक योजनांचा पाठिंबा महिलांना देत आहे.
मार्गदर्शन नंतर महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला सर्वांनी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करून एकमेकींना हळदी कुंकू लावून वान वाटपाचा कार्यक्रम पार पाडला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय जनता महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुनंदा डोंगे,मंजुषा अन्मुलवार,पौर्णिमा उरकूडे, स्वरूप झवर,शीतल वाटेकर,प्रियदर्शिनी उमरे,यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन सुनंदा डोंगे यांनी तर आभारप्रदर्शन मंजुषा अन्मुल्वार यांनी केले.