मॅजीक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने पिंपलखुट,घुगूस येथील पालकवर्ग यांचे एकदिवसीय लिंग रुढीवाद कार्यशाळा.
एस.के.24 तास
चंद्रपूर : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर संस्थेच्या वतीने चंद्रपूर तालुक्यात "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा कार्यक्रम मागील अनेक वर्षा पासून सातत्याने राबविला जात आहे.
या अनुषंगाने दिनांक 20 जानेवारी 2023 रोज शुक्रवार ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपलखुट,घुगुस येथे पालक आणि समुदायातील लोकांसोबत सामाजिक लिंग रुढीवाद या विषयावर कार्यशाळा घेऊन जन जागरूकता निर्माण करण्यात आली.या मध्ये सामाजिक लिंग भेदभाव आणि आणि सामाजिक लिंग रुढीवाद याचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊन शिक्षण घेण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी विषयी जागरूकता करण्यात आली. तसेच काही ॲक्टिवीटी घेण्यात आल्या. त्यामधे प्रत्येक सहभागीना शैक्षणिक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यशाळेला उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,अशावर्कर,अगंनवाडी सेविका तसेच मॅजिक बस चे शाळा सहाय्यक अधिकारी,संदेश चुनारकर,गणेश दुधबले,पायल राजपूत,नालंदा बोथले समूदाय समन्वयक सुलभा जुमनाके, सोनू कमतवार,विद्या अत्राम,अमिता टिपले उपस्थित होते.