आगार व्यवस्थापक यांना भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेचे निवेदन.

निवेदन देताना भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष, टेरेन्स कोब्रा.

आगार व्यवस्थापक यांना भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेचे निवेदन.


एस.के.24 तास


चंद्रपूर : भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने एस.टी.बसमध्ये राखीव जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली.


             एस.टी.बसमध्ये आमदार,स्वातंत्र्य संग्राम सैनिक,पञकार याचेसह दिव्यांगासाठी सुद्धा आरक्षित सीट ठेवण्यात यावी अशी तरतूद आहे. माञ दिव्यांगासाठी राखीव सीट असल्या तरी त्याचा लाभ त्या दिव्यांगाना मिळत नाही. बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागतो. त्याना अपमानित केले जाते.गैरव्यवहार केल्या जातो अशा कृत्यावर आळा घालणे गरजेचे आहे.

एस.टी.बसमध्ये असलेले आरक्षण हे सामाजिक आरक्षण आहे.हे त्याना मिळायलाच पाहिजेत यासाठीच भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेच्यावतीने आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

निवेदन देताना भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष,टेरेन्स कोब्रा,पोंभुर्णा तालुका सचिव,अविंशात अलगमवार, पिंपरेजी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !