श्री.विरेंद्र मेश्राम छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित.

श्री.विरेंद्र मेश्राम छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


मुल : सामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्ष संवर्धन,संरक्षण वृक्षारोपण,जनजागृती मध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल मुल येतील पर्यावरण मित्र स्वावलंबी प्रकल्प मुल संस्थेचे संचालक, श्री.विरेंद्र मेश्राम यांचा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान,सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते.." छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार " देऊन सन्मान करण्यात आले.

पुरस्काराचे स्वरूप 30,000 / - रु.चे बचत प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र होते.या कार्यक्रमास उपस्थित जिल्हाधिकारी,विनय गौडा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक,रवींद्र सिंग परदेशी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक श्री,लोणकर सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कु,चव्हाण सामाजिक वनीकरण मुलचे वनपरिक्षेत्र अधिकारी,वैभव राजुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री,विरेंद्र मेश्राम वन विभागासोबत मागील 25 वर्षापासून वन संरक्षण,वन्यजीव संरक्षण, जैवविविधता व व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असून त्यांना यापूर्वी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने " राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने गौरव " केलेला आहे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी मित्र मंडळींनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केलेला आहे.

 

वन व वन्यजीव तसेच जैवविविधता दीर्घकाळ टिकविण्यासाठी लोक सहभाग गरजेचा असून विविध यंत्रणेचे सहकार्य आवश्यक आहे - विरेंद्र मेश्राम,संचालक स्वावलंबी प्रकल्प मुल.


Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !