मॅजिक बस फाऊंडेशन व जिल्हा परिषद शाळेतील बालपणचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

मॅजिक बस फाऊंडेशन व जिल्हा परिषद शाळेतील बालपणचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी.


 

सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!S.K.24 TAAS



चंद्रपूर : मॅजिक बस फाऊंडेशन  व जिल्हा परिषद चंद्रपुर च्या  वतीने जीवन कौशल्य या कार्यक्रमा अंतर्गत आज 03 जानेवारी  2023 रोज  मंगळवार ला बालिका दिवसाचे औचित्य साधुन चंद्रपूर तालुक्यामधील विविध गावांमध्ये बालक दिवस साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी बालिका दिवस साजरा केला जातो. या कोरोनाच्या महामारित आज चे बालिका स्वतः साठी व देशाच्या भविष्यासाठी किती महत्वाचे आहे ?  

हे विद्यार्थ्याना सांगण्यात आले.तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळामध्ये बालकांसाठी,महिलांसाठी ,रॅली, संगीत खुर्ची,सामूहिक नृत्य,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,एकल नृत्य,एकल नाट्य, आयोजित केली.

यामध्ये शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.तर गावातील महिला व युवती तसेच  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनि सक्रिय सहभाग घेतला तर हा सर्व कार्यक्रम शाळेतील बालपंचायती च्या माध्यमातून पार पाडण्यात आला.


या कार्यक्रमाची रूपरेषा मॅजिक बस फाऊंडेशन चे वरिष्ठ जिल्हा प्रकल्प अधिकारी मा.प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आली,व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा सहाय्यक अधिकारी पायल राजपूत,संदेश चूनारकर,नालंदा बोथले,गणेश दुधबले,गंगाधर जाधव,प्रियंका ठमके आणि चंद्रपूर तालुक्यातील पूर्ण समूदाय समन्वयक यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !