शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन.



शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शिकाऊ  उमेदवारी योजनेअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील कौशल्यम  सभागृहात येत्या १३  जानेवारी २०२३ रोजी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.या मेळाव्यासाठी  टाटा ऑटो कॅम्प बॅटरी लिमिटेड रांजणगाव (एमआयडीसी )पुणे या  कंपनीचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.  शिकाऊ उमेदवारी करीता निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार दरमहा १२१०० रू. विद्यावेतन आणि कंपनीतर्फे विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येईल.ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी  जोडारी, संधाता,विजतंत्री,वायरमन , इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक यापैकी कुठल्याही व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केले.

असल्यास अशा उमेदवारांना एक वर्ष अप्रेंटिस  प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.  जिल्ह्यातील पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड,टीसी,आयटीआय पास प्रमाणपत्र या मुळप्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रती सह तसेच पासपोर्ट फोटो घेऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्यम सभागृह, चंद्रपूर येथे सकाळी दहा वाजेपर्यंत उपस्थित राहावे,असे आवाहन  संस्थेचे प्राचार्य रविंद्र मेहेंदळे आणि बी.टी.आर.आय. सेंटर च्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केलेले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा,असेही आवाहन त्यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !