मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या वतीने बालपंचायत मेळावा संपन्न.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या वतीने  बालपंचायत मेळावा  संपन्न.


एस.के.24 तास


 चंद्रपूर : 28/01/2023 ला पंचायत समिती चंद्रपूर येथे बालपंचायात मेळाव्याचे (चर्चासत्र) आयोजन करण्यात आले. चर्चासत्रा करिता वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी आले होते,त्या मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा,गोंडसावरी, पिंपलखुट,जिल्हा परिषद शाळा कन्या घुगूस,जिल्हा परिषद शाळा हिंदी घुगूस,जिल्हा परिषद शाळा कॉलोनी नंबर 1 घुगूस,जिल्हा परिषद शाळा म्हातारदेवी,जिल्हा परिषद शाळा खुटाडा, जिल्हा परिषद शाळा बेलसनी, जिल्हा परिषद शाळा दाताडा  या शाळेतील बलपंचायतीने चर्चासत्रात सहभाग घेतला.



सर्व प्रथम  प्रमुख पाहुणे : - 


गटशिक्षण अधिकारी -  निवास कांबळे सर, शाळेतील शिक्षक व मुख्यध्यापक व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व कार्यशाळा आणि चर्चासत्राला सुरुवात झाली.शालेय मंत्रिमंडळ म्हणजेच बलपंचायातीचे महत्व,जबाबदाऱ्या, कर्तव्य,व त्यांचे अधिकार यावर सर्व मंत्रिमंडळाला मॅजिक बस चे शाळा सहाय्यक अधिकारी संदेश चूनारकर यांनी सविस्तर माहिती दिली.


शाळेमध्ये असलेल्या विविध समस्या विद्यार्थ्यांनी कशा ओळखाव्या आणि त्यावर उपाय योजना कशा कराव्या,बालपंचायतीच्या सभेत प्रस्ताव मांडणे, सादर करण्यात आलेल्या प्रस्तावा वर चर्चा करणे,कठीण  समस्या व मोठ्या निर्णयांसाठी मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती,तसेच ग्रामपंचायतीचे सहकार्य कशा पद्धतीने घ्यावे. बालपंचायत सभेचे  अहवाल लेखन कसे करावे इत्यादी बाबतीत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. त्या सोबतच बलपंचायतीची मासिक सभा कशा प्रकारे आयोजित केली जाते याचे प्रात्यक्षिक जिल्हा परिषद उच्च प्राथिक शाळा बोर्डा येथील शालेय मंत्रिमंडळाने सादर केले. उपस्थित सर्व शालेय मंत्री मंडळातील मंत्र्यांना पुस्तके देण्यात आले. 


सदर कार्यशाळा व चर्चासत्राला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा शिक्षक प्रशांत काटकर सर,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोंडसावरी चे मुख्याध्यापक गुलाब माथेरे,जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा,म्हातारदेवी चे मुख्याध्यापक साळवे सर,जिल्हा परिषद शाळा कन्या घुगूस चे पाल सर उपस्थित होते.


संपुर्ण चर्चासत्र हे शाळा सहायक अधिकारी,संदेश चूनारकर,पायल राजपूत,गंगाधर जाधव,गणेश दुधबले, प्रियंका ठमके,नालंदा बोथले तसेच  समुदाय समन्वयक,सुलभा जुमनाके, सोनू कामतवार,विद्या आत्राम,साधना गेडाम,आदर्श चीवंडे,सूरज शर्मा यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीरित्या बालपंचायात मेळावा पार पडला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !