" टाटा मुंबई मॅराथाॅनव " मध्ये धावणाऱ्या १६ महिला गाव कारभारनिंनी गाजविली " टाटा मुंबई मैराथान "

" टाटा मुंबई  मॅराथाॅनव " मध्ये धावणाऱ्या १६ महिला गाव कारभारनिंनी गाजविली " टाटा मुंबई  मैराथान "


एस.के.24 तास


चंद्रपूर : अत्यंत प्रतिष्टेच्या ' टाटा मुंबई मॅराथाॅन " मध्ये राज्यभरातील निवडक १६ महिला सरपंचा मकर संक्रातीच्या शुभपर्वावर १५ जाने.२०२३ ला देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई  येथे  महिला सबलीकरणाचा संदेश धावल्या व त्यांनी मैराथान गाजविली.राज्यभरात २९२० पैकी निवडक १६ सरपंचा  व महिला पदाधिकाऱ्यांचा सहभाग असलेली प्रतिष्टेची मॅराथाॅन आयोजित करण्यात आली होती.

या मॅराथाॅन करीता निवडण्यात आलेल्या सर्व १६ महिला सरपंचा यांनी ग्राम पंचायत पातळीवर आपल्या कुशलतेने, कल्पकतेने कारभार सांभाळून पारदर्शकतेने गावांचा विकास साधला आहे. गावस्तरावर विवीध योजना,उपक़म राबवून गावाचा नावलौकिक  केला आहे.अशा निवडक सन्मानप्राप्त महिला सरपंचाना नारी शक्तीचा सन्मान म्हणून या प्रतिष्टेच्या मैराथान मध्ये सहभागी करण्यात आले होते.

राज्यभरातून निवडक १६ महिला सरपंचामध्ये निवड करण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातून  ऍड.शर्मिला रामटेके,अर्चना जटकर यवतमाळ,उमा माळी अकोला,नंदा गायकवाड परभणी,सुरय्या पठाण,सुनंदा मांदाडे,वर्षा पिंगळे,सीमा पाचंगे, पुणे,रत्नमाला वैद्ध भंडारा,शारदा गायधने भंडारा,अर्चना कांबळे भंडारा,हर्षदा वालके सिन्धुदुर्ग,संगीता वेन्दे या महिला सरपंचा आज प्रतिष्टेच्या "टाटा मुंबई मॅराथाॅन " मध्ये सहभागी झाल्यात.

महिलांचे स्वप्न घेऊन,लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी टाटा मुंबई  मैराथान मध्ये या कार्यशिल महिला सरपंच यांना या प्रतिष्टेच्या  उपक़मात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला.  महिला राजसत्ता आंदोलनाच्या प्रमुख माधुरी लाड,मालती सगणे समन्वयक यांनी पुढाकार  घेत या कार्यशील १६ महिला गाव कारभार निवड देशाच्या आर्थिक राजधानीत मान मिळवून दिला.

संपुर्ण महाराष्ट्रात २७९२० महिला सरपंचा गावप़मुख बनून कारभार सांभाळीत आहेत. या २७९२० महिला सरपंचाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या निवडक १६ महिला सरपंचाना देण्यात आली.महिलांचा आत्मसन्मान व आत्मविश्वास वाढावा वजह महिलांच्या कतुत्वाची गगनभरारी लोकांपर्यत पोहोचावी याकरीता ही प़तिष्टेची "टाटा मुंबई  मैराथान"आयोजीत करण्यात आल्याचे राज्यातील महिलांची सर्वोच्च संघटना असलेल्या महिला राजसत्ता आंदोलन यांनी स्पष्ट केले.यात आर.एस.ई.डी. व ईशाद या संघटनांचा सुद्धा सहभाग होता.शाशनस्तरावर उत्कृष्ट कार्यासाठी लौकीक प्राप्त १६ महिला सरपंचाचे सहभागाने त्या त्या जिल्ह्यांना मोठा सन्मान मिळाला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !