एक जहाल नक्षलवादी व एक जनमिलिशियास अटक.

एक जहाल नक्षलवादी व एक जनमिलिशियास अटक.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक : 30 जानेवारी 2023 फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात.या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे,पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे,रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात.याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षलवाद्यास व एका जनमिलिशियास दिनांक 28/01/2023 रोजी अटक केले.


जहाल नक्षली नामे मंगेश ऊर्फ कांडेराम पोटावी, वय 33 वर्षे, रा.होरादी तह.जि.नारायणपूर (छत्तीसगड) येथील रहीवासी असून सन 2005 मध्ये नक्षल दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन तो सध्या परालकोट दलममध्ये सीएनएम (चेतना नाट्यकला मंच) कमांडर या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये मौजा गारपा जंगल परिसरात पोलीस पार्टीवर अॅम्ब्युश व चकमक तसेच मौजा बेरेवाडा जंगल परिसरातील चकमक सन 2009, जाळपोळ,दरोडा,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गुन्हे नोंद असून दिनांक 28/01/2023 रोजी उपविभाग एटापल्ली मधील उपपोस्टे कसनसूर हद्दीतील कसनसूर या गावात आला असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस पार्टीने अभियानादरम्यान त्याला ताब्यात घेतले.त्यास 2019 साली उपपोस्टे कसनसुर येथे दाखल अप.क्र. 07/2019 या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.सोबतच त्याच्यावर प्राथमिक माहितीनुसार नारायणपूर (छत्तीसगड) येथे गुन्हा दाखल असून अधिकचा तपास नारायणपूर पोलीस यांचे सहकार्याने गडचिरोली पोलीस दल करत आहे.


तसेच नामे चिन्ना मासे झोरे, वय 40 वर्षे, रा. रामनटोला,तह.एटापल्ली जि. गडचिरोली येथील रहीवासी असून तो सन 2005 पासुन गट्टा दलममध्ये जनमिलिशिया सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर मीजा गर्देवाडा जंगल परिसर ब्लास्टींग व चकमक 2014 व मौजा कुरेंनार (छत्तीसगड) येथील रोड कामावरील वाहन जाळपोळ इ. गुन्हे दाखल आहेत. दिनांक 28/01/2023 रोजी पोमकें गड्डा (जां.) हद्दीत पोलीस पार्टीने मौजा टिटोळा ते जांबीया जंगल परिसरात अभियान राबवित असतांना ताब्यात घेण्यात आले. त्यास 2014 साली पोस्टे एटापल्ली येथे दाखल अप.क्र.13/2014 मौजा गर्देवादा येथे झालेल्या ब्लास्टींग व चकमक या गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.


गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 62 नक्षलवाद्यांना अटक, 08 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण व 03 नक्षलवाद्यांचा पोलीस-नक्षल चकमकीमध्ये मृत्यु झाला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा,मा.अपर पोलीस आहे.


गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 62 नक्षलवाद्यांना अटक,08 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण व 03 नक्षलवाद्यांचा पोलीस-नक्षल चकमकीमध्ये मृत्यु झाला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा.मा.अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.कुमार चिंता सा.मा.अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा.यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.मा.पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल सा.यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !