अन् ८१ वर्षीय दादा पारधी पुरस्काराने गहिवरले. ★ झाडीपट्टी लोककलावंत पुरस्कार आ.होळी यांच्या हस्ते दादा पारधी यांना प्रदान.

अन् ८१ वर्षीय  दादा पारधी पुरस्काराने गहिवरले.


झाडीपट्टी लोककलावंत पुरस्कार आ.होळी यांच्या हस्ते दादा पारधी यांना प्रदान.


एस.के.24 तास


गडचिरोली : झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने  दरवर्षी  एका झाडीपट्टी लोककलावंतास पुरस्कार देण्यात येतो.मंडळाकडे आलेल्या प्रवेशिका मधून निवड समितीने उत्कृष्ट ज्येष्ठ झाडीपट्टी लोककलावंत पुरस्कारासाठी यावेळी श्री.दादा अंताराम पारधी (मालडोंगरी) यांची निवड केली होती.सदर पुरस्काराचे वितरण मोठ्या थाटामाटात गडचिरोली येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आ.डॉ.देवराव होळी,प्रंचित सावकार पोरेड्डीवार,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर  यांचे हस्ते करण्यात आले.पुरस्काराचे वितरण प्रसंगी दादा पारधी गहिवरले, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.प्रकृती अस्वस्थतामुळे त्यांची गेल्या वीस दिवसापासून तब्येत बरी नाही तरी ते या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी त्यांचे सुपुत्र प्रेमदास पारधी,संपूर्ण पारधी परिवार विशेषत्वाने उपस्थित होता.सदर पुरस्कार मंडळाचे वतीने दिवंगत कोमाजी गोपी पाटील खूणे यांच्या स्मरणार्थ मानचिन्ह,रोख रक्कम स्वरूपात देण्यात आला.  

   श्री.दादा पारधी सध्या ८१ वर्षांचे असून त्यांनी आपल्या आयुष्याचे ३५ वर्षे जनप्रबोधनाच्या  कार्यात  घालविले आहे.त्यांनी झाडीपट्टी प्रदेशात निष्काम भावनेने सेवा दिलेली आहे.त्यांनी आजवर मानधनाची कुठलिही अपेक्षा न करता नकला,खडीगंमत,दंडार, झाडीनाट्य च्या माध्यमातून मनोरंजनातून लोकप्रबोधन प्रभावीपणे केलेले आहे. तसेच  त्यांनी शासनाच्या साक्षरता अभियान, लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम,आधुनिक शेती, निसर्गोपचार,श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी च्या कार्यांत आपल्या परीने योगदान दिलेले आहे.

कर्मयोगी संत श्रीतुकारामदादा गीताचार्य यांचा पावन सहवास त्यांना लाभला आहे.श्री.पारधी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी घुग्घुस येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.यावेळी साहित्य मंडळाचे डॉ.चंद्रकांत लेनगुरे,कमलेश झाडे,संजीव बोरकर,पुरूषोत्तम ठाकरे,उपेंद्र रोहणकर, डॉ.किलनाके,विलास दशमुखे,अरुण झगडकर, लक्ष्मण खोब्रागडे,जितेंद्र रायपुरे,प्रा.ज्योती कावळे,अरविंद गेडाम यांची उपस्थिती होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !