नवेगाव पांडव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

नवेगाव पांडव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.


एस.के.24 तास


नागभीड : नेहमप्रमाणेच नाविन्यपूर्ण उपक्रम, नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची यशस्वीता हे  नवेगाव पांडव ग्रामपंचायत  चे वैशिष्ट्य आहे. त्याची परिनीती प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे पहावयास मिळाली.नवेगावपांडव येथील दोन हायस्कूल, एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तीन अंगणवाडी, एक कानव्हेटं,आरोग्य केंद्र,बँक,पोस्ट आफिस, शेतकीय सोसायटी,गुरूदेव होस्टेल‌ या सर्वांच्या वतीने झेंडावंदन करून गावात फेरी काढण्यात आली.डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

               


 
दररोज प्रमाणे गावातील सरपंच ॲड.  शर्मिला रतनकुमार रामटेके गुणवंत विद्यार्थ्यां च्या हस्ते झेंडावंदन करतात.त्यांनतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे  वाचन करण्यात आले.कुष्ठरोग निवारण विषयी शपथविधी सुध्दा करण्यात आली. ह्या वर्षी तन्वी शशीकांत राहाटे च्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले.या मुलीने लीप्टींगलाईफ या खेळ प्रकारात २५० किलो वजन उचलले होते महाराष्ट्र स्तरावर तीला तीन गोल्ड मेडल मिळाले म्हणुन गावचे वतीने तीला ट्राफी, पुष्प, गुच्छ देऊन गौरविण्यात आले.१० व्या वर्गात गायत्री रेवणनाथ पांडव ने.ही.विध्यालय नवेगाव पांडव ची विद्यार्थिनी हिला ८९%गुण आले. सदर योजनेला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. 

         


सरपंच अँड शर्मिला रतनकुमार रामटेके यांची चंद्रपुर जिल्हा मधून महाराष्ट्राच्या  टाटा मुंबई मेरेथान मधे त्याची निवड झाली.टाटा मुंबई मेरेथान ही जगातील 6 व्हा नंबरची स्पर्धा आहे.55,000 लोकांना बरोबर ते धावले व त्या ड्रीम रन ठरल्या.म्हणून ग्रामपंचायत नवेगाव पांडव च्या वतीने ट्राफी व  पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले करण्यात.तसेच ने.ही.हास्कुल ह्या संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करून प्रभात फेरी काढली व गावांची स्वच्छता केली.त्यानां सुध्दा ट्राफी पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

              

कोरोणा काळात चांगले  काम केल्याबद्दल ग्रांमपंचायत कर्मचारी विजय श्रीराम नवघडे, अतुल दादाजी पांडव यांना  ट्राफी पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. क्षय रोग रुग्णांना किट्स वाटप करण्यात आले. 12वर्गाचे 4 विध्यार्थी व 10 वर्गा चे 4 ,4 विध्यार्थी ने.ही विद्यालय 4विध्यार्थी धर्मराज विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विध्यार्थी 4, व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकांकिका केलें त्यांना सुध्दा ट्राफी पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला उपस्थित विजय पंढरी बोरकुटे उपसरपंच नवेगाव पांडव.व सर्व पदाधिकारी उपस्थित होते, गावांतील तरुण मुलं,मुली प्रतीष्टीत नागरिक स्त्रिया व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          

प्रास्ताविक क्षिरसागर ग्राम विस्तार अधिकारी ग्रामपंचायत नवेगांव पांडव यांनी केले.ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ने ही विद्यालय नवेगाव पांडव चे शिक्षक कुथे सर यांनी केले. हया कार्यक्रमाचे अध्यक्ष,अँड शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलले की आपण संविधानात समता,स्वातंत्र्य, बंधुता व एकात्मता यांची आन बाण शान नागरीकांनी राखलीच पाहीजे लागलीच पाहीजेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !