आनंदाचा दिवस पण.अश्रु अनावर.

आनंदाचा दिवस पण.अश्रु अनावर.


मंगल राजे मशाखेत्री!प्रतिनिधी!एस.के.24 तास


मुल : 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरगाव च्या इयत्ता 6 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु आदर्श प्रमोद मडावी हा विद्यार्थी खूप हुशार होतकरू आहे.वडील असून नसल्यासारखे,आई ची प्रकृती बरी राहत नसल्याने घरातील, पाणी,जेवण बनवणे ते भांडी कुंडी करून न चुकता शाळेत हजर असतो,

परंतु त्याच्या घरची परिस्थिती त्याला पाहिजे तेवढी साथ मिळत नसल्याचे बघून शाळेतील वर्ग 6 चे  वर्गशिक्षक मान श्री.गेडाम सर व वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एक हात मदतीचा हा उपक्रम राबवत कु.आदर्श या विद्यार्थ्याला मान सौ.प्रतिभा ताई जुमनाके सरपंच व मान श्री.शरद ह.नागापुरे अध्यक्ष शा.व्य.स यांचे हस्ते स्कूल भेट दिली.


या विद्यार्थ्याला एक मदतीचा हात या उपक्रमातून भेट वस्तू देत असताना मान श्री.गेडाम सर व विद्यार्थी आदर्श मडावी अगदी भावुक होत त्यांना नैनामधील अश्रु अनावर झालेत.या एक हात मदतीचा या उपक्रमाचं समस्त उपस्थितांच्या वतीने टाळ्या वाजवुन स्वागत करण्यात आले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !