चकपिरंजी ग्रामपंचायत ग्रामसभेत गोंधळ ; सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांचा ग्रामपंचायतला निवेदन.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील ग्रामपंचायत चकपिरंजी येथे दि.२६ जानेवारी २०२३ला सरपंच मा.उषाताई गेडाम याच्या अध्यक्षते खाली ग्रामसभा आयोजित केली होती.परंतु ग्रामसभा पुर्ण नकरता उशीर झाल्याने ग्रामसेवक मा.भावना भानारकर यांनी चांदली बुज येथील ग्रामसभा घेण्यासाठी निघून गेल्या.
त्यानंतर गावातील नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी गावातील काही समस्या ग्रामसभेत मांडल्या त्यावर उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने गावातील नागरिकांचे समाधन झालेले नाही आणि ग्रामसभेत गोंधळ तयार झाला सर्व ग्रामस्थ नागरिकांनी निवेदन देऊन हि ग्रामसभा तहकूब करून पुढील सात दिवसात घेण्यात यावी आणि ग्रामसेवक त्या ग्रामसभेत उपस्थित राहावे अशी मागणी गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी केली आहे.