शा.औ.प्र.संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख,ख्रिश्चन,जैन,मुस्लिम, नवबौद्ध युवक युवतीसाठी स्किल सेंटर योजने अंतर्गत अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून त्याकरिता इच्छुकांकडून प्रवेश अर्ज स्विकारण्यात येत आहे. सदर अभ्यासक्रम ४ महिने कालावधीचे असून प्रत्येक व्यवसायात उपलब्ध जागा ३० आहे.सीएनसी ऑपरेटर वर्टीकल मशीनिंग सेंटर,ड्राफ्ट्रसमन मेकॅनिकल, वेल्डिंग टेक्निशियन लेव्हल ३,आय.टी.कोआर्डीनेटर इन स्कूल,इलेक्ट्रिशन डोमेस्टिक सोल्युशन,आयर्न अँड स्टील मशीनिस्ट असे सहा महत्त्वाचे अभ्यासक्रम आहे.
या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी किमान दहावी पास असणे गरजेचे आहे. दहावीची मार्कशीट,टीसी,मायनारिटी सर्टिफिकेट, डोमिसिएल सर्टिफिकेट,आधार कार्ड या कागदपत्रांच्या झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट फोटो लावून प्रवेश अर्ज भरता येईल.अल्पसंख्यांक समाजातील उमेदवार न मिळाल्यास सर्वसाधारण उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल.इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी केले आहे.