किशोरी स्वास्थ्य टिकवण्यासाठी अंंधश्रद्धा व व्यसनापासून लोकांना दूर ठेवण्यासाठी सातत्याने समाज प्रबोधनाची आवश्यकता. - डॉ.सुनील मडावी



किशोरी स्वास्थ्य टिकवण्यासाठी अंंधश्रद्धा व व्यसनापासून लोकांना दूर ठेवण्यासाठी सातत्याने  समाज प्रबोधनाची आवश्यकता. - डॉ.सुनील मडावी


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील नवेगाव (मुरखडा) येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत आयोजित राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पिअर एज्युकेटर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी डॉ.सुनील मडावी तालुका आरोग्य अधिकारी, प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.विनोद बिटपल्लीवार वैद्यकीय अधिकारी,डॉ बासू नरोटे वैद्यकीय अधिकारी अमिर्झा, डॉ विनोद म्हशाखेत्री जिल्हा साथरोग अधिकारी,डॉ.शारदा कुमरे वैद्यकीय अधिकारी पोटेगाव, डॉ.नारायण करेवार सर वैद्यकीय अधिकारी चांदाळा तर अंंधश्रद्धा निर्मूलन संबंधी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पचे राज्य सहकार्यवाह श्री.विलास निंबोरकर जिल्हा कार्याध्यक्ष,श्री.विठ्ठलराव कोठारे,नशाबंदी मंडळ चे जिल्हा अध्यक्ष,श्री.संदीप कटकुरवार आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ,मडावी यांनी समाजाला अंंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आशा वर्कर व पिअर एज्युकेटर प्रशिक्षणार्थ्यांनी लोकांना जागृत करून वैद्यकीय उपचार करण्यासाठी प्रबोधन करत राहावे असे आवाहन केले.डॉक्टर म्हशाखेत्री यांनी शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी पोषक आहार घेण्याची गरज आहे व वेळोवेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तत्पर असले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले. सोबतच मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी विषयाच्या अनुषंगाने मोलाचे मार्गदर्शन केले. 

तर विठ्ठलराव कोठारे यांनी नारळातून करणी काढणे,हातावर आणि तोंडात जळता कापूर ठेवणे,लोट्यातून वारंवार पाणी काढणे,पाण्याचा रंग बदलणे,हवेतून मौल्यवान वस्तू अगर विभूती काढणे,चालणीतून पाणी आणणे,बीना मॅचीस ने यज्ञ पेटवणे,पाण्यावर दिवा पेटवणे आदी चमत्कार दाखवून अंंधश्रद्धा समाजातून हद्दपार करण्यासाठी युवक युवतींनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. 

तर वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पचे राज्य सहकार्यवाह श्री.निंबोरकर यांनी चमत्कारामागे काय दडलेलं असते,ते कसे घडतात,त्यामागील कार्यकारणभाव काय असू शकतात यावर मार्गदर्शन करून ते  कसे शोधून काढले पाहिजे यावर विस्तृत माहिती दिली.सदर चमत्कारामागे मंत्रशक्ती,दैवी शक्ती,किंवा सिद्धी हे कारणीभूत असू शकते का ? किंवा मंत्रशक्तीने करणी भानामती जादूटोणा करून एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करता येते का ? तसेच विषारी सापाचे विष उतरवणे शक्य आहे का ? असे विविध प्रश्न विचारून प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आलेल्या युवक युवतींना प्रबोधन करुन अंंधश्रद्धेतून बाहेर पडणे कसे आवश्यक आहे व स्वास्थ्य टिकवण्यासाठी वैद्यकीय सल्ला व उपचार कसे गरजेचे आहे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती सांगून त्या द्वारे आजपर्यंत अनेक बुवा बाबा मांत्रिक कसे जेलमध्ये गेले व अनेक जण आजही कोर्ट केसेस मध्ये कसे अडकून पडले आहेत याविषयी विस्तृतपणे माहिती देण्यात आली.

 नशाबंदी मंडळ चे जिल्हा अध्यक्ष,श्री संदीप कटकुरवार यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगून समाजाला व्यसनमुक्त केल्याशिवाय त्याचे स्वास्थ्य उत्तम राहू शकत नाही. व्यसनी व्यक्तीमुळे समाजाचेच संपूर्ण आरोग्य बिघडते. आर्थिक परिस्थिती खंगून जाते. उपचारासाठी जेव्हा पैसे शिल्लक नसतात तेव्हा अशा व्यक्ती अंंधश्रद्धेच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करून घेतात तेव्हा सर्व पिअर एज्युकेटरनी स्वतः व्यसनमुक्त राहुन समाजालाही व्यसन मुक्त करण्यासाठीचा आजच्या दिवशी संकल्प करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक श्रीमती काटवले मॅडम यांनी केले. 

 सूत्रसंचालन श्री,हरिदास कोटरंगे साहेब यांनी तर आभारप्रदर्शन श्री,विजय रामटेके अकाउंटन्ट यांनी केले. कार्यक्रमाला गडचिरोली तालुक्यातील आशावर्कर व पिअर एज्युकेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिअर एज्युकेटर व आशा वर्कर्स यांनीही चमत्कार सादरीकरणात सहभाग घेतला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !