उद्या गडचिरोली येथे पत्रकार दिन व डिजीटल मिडीया कार्यरत पत्रकारांचा परिचय मेळावा कार्यक्रमाचे आयोजन.


उद्या गडचिरोली येथे पत्रकार दिन व डिजीटल मिडीया कार्यरत पत्रकारांचा परिचय मेळावा कार्यक्रमाचे आयोजन.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


गडचिरोली : जेष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ साली समाजाच्या जडणघडणीसाठी व समाज प्रबोधन करण्यासाठी 'दर्पण' नावाचे पाहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. तसेच ६ जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस असल्याने दरवर्षी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून गडचिरोली येथे लोकवृत्त न्यूज तसेच The गडविश्व न्यूज च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार  ६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० ते ०२.०० वाजतापर्यंत पत्रकार दिन व डिजीटल मिडीया कार्यरत पत्रकारांचा परिचय मेळाव्याचे आयोजन येथील धानोरा मार्गावरील ग्रामसेवक भवन गडचिरोली येथे करण्यात आले आहे. 

देशाच्या जडणघडणीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे जनतेचा आणि लोकशाही मधील दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले आहे.अशाच पत्रकारांचा यथोचित गौरव सत्कार व्हावा म्हणून डिजिटल मीडिया आपल्या लेखणीने समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे लोकशाहीचे खरेखुरे आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा जिल्हास्तरीय मेळावा तथा डिजिटल मीडियात उत्कृष्ट कार्य केलेल्या पत्रकारांचा येथोचित गौरव सत्कार समारंभ बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमाला अध्यक्ष,म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई पूर्व प्रांताध्यक्ष प्रा.महेश पानसे,प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गडचिरोली  जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक भास्कर चे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी रुपराजजी वाकोडे,जेष्ठ पत्रकार तथा D वाईस न्यूज पोर्टलचे संपादक रोहिदासजी राऊत, माहिती अधिकार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तुळशीरामजी जांभुळकर,डिजिटल डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया,एस.न्यूज. संपादक सुरज बोम्मावार,चांदा ब्लास्ट उपसंपादक आशिष रैच,खरे वृत्तांत न्यूज पोर्टल संपादक मोरेश्वर उद्योजवार,एस.के.24 तास न्युज मुख्य संपादक, सुरेश कन्नमवार

 सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र मत न्यूज २४ तास पोर्टल चे संपादक खोमदेवजी तुम्मेवार उपस्थित राहणार आहे.तसेच  कार्यक्रमादरम्यान डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य देवनाथ गंडाते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमात गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील डिजीटल मीडियात कार्यरत असलेल्या जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शनाचा लाभ घेऊन पत्रकार दिन साजरा करण्याचे आवाहन लोकवृत्त न्यूज चे संपादक निलेश सातपुते,The गडविश्व न्यूज चे संपादक सचिन जिवतोडे यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !