ए.व्ही.जी.गोट फार्म येथे बनावट देशी दारू निर्मिती कारखाना वर धाड.

ए.व्ही.जी.गोट फार्म येथे बनावट देशी दारू निर्मिती कारखाना वर धाड.


एस.के.24 तास


मुल :  संजय पाटील अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,चंद्रपूर,यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुल यांनी दिनांक २५/०१/२०२३ रोजी मुल-सिंदेवाही रोडवरील,चित्तेगावच्या हद्दीत एल्गार समिती संस्था कला वाणिज्य महाविद्यालयाला लागून असलेल्या ए.व्ही.जी.गोट फार्म या शेळी प्रशिक्षण संस्थेच्या गोडाऊनमध्ये मौजे चित्तेगाव, ता.मुल,जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी बनावट देशी दारू तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकुन सदरचा बनावट देशी दारू कारखाना उध्वस्त केला. 

सदर गुन्ह्याची माहिती खालील प्रमाणे : - गुन्हा रजि. क्र.०४/२०२३,दि. २५/०१/२०२३ दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,मुल स्पिरीट (मद्यार्क)३०८० ब. लिटर अवैध बनावट देशी मद्य सदृश्य द्रावण ५०० लिटर कारखाना उच्चस्त मिळालेल्या खात्रीशीर माहिती,सिल करणारी मशीन,वेट मशीन ०१ मुल सिंदेवाही रोड वरील आरो मशीन ०१,९० मिली क्षमतेच्या रिकाम्या बाटल्या. ५७,००० बॉटल रॉकेट ब्रांडचे बनावट लेबल १,५०,००० लेबल इतर साहित्य.


1) फ्लेवर बॉटलआहेत. 2) मोटार पंप - ०१

3) प्लास्टिक ट्रे - १४ 4) सिलेंडर व शेगडी - ०१

5) चिकटपट्टी बंडल ०३ बॉक्स 6) बुचे - ५ बॉक्स

7) खरड्याचे पुठ्ठे - ३५०० 8) पाईप 9) बकेट २

10) मग्गा ४ 11) रिकामे ड्रम - १० 12) रबर पाकेट ५०

13) हायड्रोमीटर - ०१ 14) इसेन्स बाटली ०४

15) डिंक बॉटल 16) ५०० ली. क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या  17) ब्लेंड घुसाळण्याची इलेक्ट्रिक रवी - ०१ 18) दोरीचे ०५ बंडल


जप्त मुद्देमालाची एकूण किंमत : - रु.१६,५०,०००/-

फरार आरोपीची नावे : - 

1) पवन उर्फ गोलू वर्मा

2) राजू शामराव मडावी


व इतर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी दि. १७/०१/२०२३ रोजी सिंदेवाही तालुक्यात बनावट देशीमद्याचे १० बॉक्स व चार चाकी वाहन जप्त केले होते. सदर गुन्ह्यात फरार झालेल्या आरोपींचाच वरील गुन्ह्यातही समावेश आहे.सदर कारवाई ही डॉ.विजय सुर्यवंशी,आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य मुंबई,सुनील चव्हाण,संचालक (अं.व.द.) महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री. मोहन वर्दे,विभागीय उपआयुक्त,रा.उ.शु, नागपूर विभाग,संजय पाटील,अधीक्षक, रा. उ.शु.,चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.संदीप राउत,दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुल यांनी केली.


यामध्ये श्री.विकास बी.थोरात, निरीक्षक,रा.उ.शु,वरोरा,श्री.ईश्वर वाघ,निरीक्षक, भरारी पथक,चंद्रपूर,अमित क्षीरसागर (दु. निरीक्षक),श्री.संजय आक्केवार (दु. निरीक्षक),अभिजित लिचडे (दु.निरीक्षक), जगदीश पवार (दु.निरीक्षक,सौ.मोनाली कुरुडकर (दु.निरीक्षक) तसेच जवान सर्वश्री चंदन भगत, अजय खताळ,गोकुळ पवार,राहुल अत्रे,किशोर पेदुजवार,जगदीश कापटे,प्रशांत घोडमारे, दिलदार रायपुरे,जगन पुठ्ठलवार, प्रविकांत निमगडे यांनी पार पाडली.सदरील गुन्ह्याचा पुढील तपास . संदीप राउत, दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,मुल हे करीत आहेत.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !